Home /News /sport /

IPL 2022 : चेन्नईच्या पराभवानंतरही CSK फॅन खूश, धोनीनं दिली Good News

IPL 2022 : चेन्नईच्या पराभवानंतरही CSK फॅन खूश, धोनीनं दिली Good News

Photo: BCCI

Photo: BCCI

खराब कामगिरी आणि राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या पराभवानंतरही चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super Kings) फॅन्स शुक्रवारी खूश झाले.

    मुंबई, 21 मे : चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) आयपीएल 2022 मधील प्रवास समाप्त झाला आहे. राजस्थान रॉयल्सनं (Rajsthan Royals) शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये चेन्नईचा 5 विकेट्सनं पराभव केला. गेल्या वर्षी आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या टीमचं आव्हान यंदा 'प्ले ऑफ' पूर्वीच संपुष्टात आले. चेन्नईनं या सिझनमध्ये फक्त 4 विजय मिळवले असून आयपीएल इतिहासातील त्यांची ही सर्वात खराब कामगिरी आहे. खराब कामगिरी आणि राजस्थान विरूद्धच्या पराभवानंतरही चेन्नईचे फॅन्स शुक्रवारी खूश झाले. चेन्नई फॅन्सच्या आनंदाचं कारण महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आहे. धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2020 साली निवृत्ती घेतली आहे. तो आता फक्त आयपीएलमध्ये खेळतो. आयपीएलमधील चेन्नईच्या शेवटच्या मॅचमध्ये धोनीला तो पुढील वर्षी खेळणार का? हा प्रश्न गेल्या 3 वर्षांपासून विचारला जात आहे. शुक्रवारी देखील तो विचारण्यात आला. त्यावेळी धोनीनं चेन्नईच्या फॅन्सना गुड न्यूज दिली आहे. धोनीनं पुढच्यावर्षी देखील खेळणार असल्याचं जाहीर केलं आहे. 'चेन्नईमध्ये न खेळता निरोप घेणे, चुकीचे ठरेल. मुंबईमध्ये मला खेळाडू म्हणून तसंच टीम म्हणून खूप प्रेम आणि आपुलकी मिळती. पण, तो सीएसकेच्या फॅन्सशी अन्याय असेल. पुढच्या वर्षी टीमना वेगवेगळ्या जागी खेळण्याची संधी मिळेल अश आशा आहे. त्यामुळे त्या सर्व ठिकाणी जाऊन आभार मानता येतील. मी पुढच्या वर्षी दमदार पुनरागमनासाठी कठोर परिश्रम करणार आहे.' असं धोनीनं सांगितलं. IPL 2022 : गावसकर यांच्या वक्तव्यानं नवा वाद, कॉमेंट्री पॅनलमधून हटवण्याची मागणी धोनीच्या कॅप्टनसीमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं 4 वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलं आहे. तो चेन्नईचा सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. धोनीनं या सिझनच्या सुरूवातील रविंद्र जडेजाकडं (Ravindra Jadeja) कर्णधारपद सोपवलं होतं. पण टीमच्या खराब कामगिरीमुळे तो पुन्हा एकदा कर्णधार बनला. आता पुढील सिझनमध्येही धोनीनं चेन्नईचा कर्णधार असेल की नाही? याबाबत त्यानं कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, Ipl 2022, MS Dhoni, Rajasthan Royals

    पुढील बातम्या