जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : एकाच ओव्हरमधील 2 चुका पडल्या महाग, 5 बॉलमध्ये निसटला RCB चा विजय

IPL 2022 : एकाच ओव्हरमधील 2 चुका पडल्या महाग, 5 बॉलमध्ये निसटला RCB चा विजय

IPL 2022 : एकाच ओव्हरमधील 2 चुका पडल्या महाग, 5 बॉलमध्ये निसटला RCB चा विजय

पंजाब किंग्ज विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Punjab Kings vs Royal Challengers Bangalore) या मॅचमध्ये 400 पेक्षा जास्त रन निघाले. या मॅचमध्ये आरसीबीला (RCB) या मॅचमध्ये एकाच ओव्हरमध्ये केलेल्या दोन चुकांचा मोठा फटका बसला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 मार्च : आयपीएल 2022 (IPL 2022) ची सुरूवात धमाकेदार झाली आहे. या सिझनच्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या पंजाब किंग्ज विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Punjab Kings vs Royal Challengers Bangalore) या मॅचमध्ये 400 पेक्षा जास्त रन निघाले. RCB नं दिलेलं 206 रनचं टार्गेट पंजाबनं 5 विकेट्स आणि 6 बॉल राखत पूर्ण केलं. या विजयासह पंजाबनं स्पर्धेतील पहिल्या सामन्यात विजयाची नोंद केली आहे. आरसीबीला (RCB) या मॅचमध्ये एकाच ओव्हरमध्ये केलेल्या दोन चुकांचा मोठा फटका बसला. पंजाबनं 206 रनचा पाठलाग जोरदार सुरू केला होता. शिखर धवन आणि मयंक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी 71 रनची भागिदारी केली. भानूका राजपक्षेनंही 22 बॉलमध्ये 43 रनची आक्रमक खेळी केली. त्यानंतरही बँगलोरनं मॅचमध्ये पुनरागमन केले होते. 15 ओव्हरपर्यंत पंजाबची निम्मी टीम आऊट झाली होती. तर त्यानंतर 16 व्या ओव्हरमध्ये फक्त 4 रन गेले. पंजाबला विजयासाठी शेवटच्या 4 ओव्हर्समध्ये 44 रन आवश्यक होते. 5 बॉलमध्ये 2 चुका आरसीबीसाठी 17 वी ओव्हर महत्त्वाची होती. हर्षल पटेलनं त्या ओव्हरमध्ये फक्त 8 रन दिले. या ओव्हरमधील 2 चुकांचा फटका त्यांना बसला. या ओव्हरचा चौथा बॉल ओडियन स्मिथने (Odean Smith) डीप एक्स्ट्रा कव्हरला लगावला. तो बॉल तिथं उभा असलेला फिल्डर अनुज रावतच्या हातामध्ये गेला होता. त्यापूर्वी 2 जबरदस्त कॅच घेणाऱ्या अनुजनं यावेळी एक सोपा कॅच सोडला. स्मिथ त्यावेळी फक्त 1 रन काढून खेळत होता. त्यानंतर पुढच्या बॉलवर हर्षल पटेलच्या आळशीपणामुळे स्मिथला आणखी एक जीवदान मिळाले. शाहरूख खाननं शॉर्ट कव्हर्सला मारलेला बॉल सिराजच्या हातामध्ये गेला. स्मिथ रन काढण्यााठी पळाला. त्याला शाहरूखनं परत पाठवलं. सिराजनं थेट हर्षलच्या हातामध्ये थ्रो केला होता. त्यावेळी हर्षलनं थेट थ्रो केला नाही. तो एक सेकंद थांबला. तेवढ्या वेळात स्मिथन डाईव्ह लगावत स्वत:ला वाचवलं. हर्षलनं थेट थ्रो केला असता तर स्मिथ त्या बॉलवर आऊट झाला असता. IPL 2022 : दिल्लीविरुद्धच्या दारूण पराभवनंतर Rohit Sharma ला बसला आणखी एक मोठा धक्का स्मिथनं त्या दोन जीवदानाचा मोठा फायदा घेतला. त्याने 8 बॉलमध्ये 1 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं नाबाद 25 रन केले. स्मिथनं सिराजच्या पुढील ओव्हरमधील 5 बॉलमध्ये ही फटकेबाजी केली. या आक्रमक खेळीबद्दल स्मिथला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ चा पुरस्कार देण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात