मुंबई, 15 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये डीआरएसचा (DRS) मुद्दा चांगलाच वादग्रस्त ठरतोय. मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) यांच्यातील सामन्यात हे प्रकरण चांगलंच वादग्रस्त ठरले होते. त्यावेळी मैदानात चेन्नईला तांत्रिक कारणामुळे डीआरएस घेता आला नव्हता. सीएसकेचा मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंगनं या विषयावर नाराजीही व्यक्त केली. आता कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) या सामन्यांतही या विषयावर वाद झाला.
कोलकाता नाईट रायडर्सची बॅटींग सुरू असताना हा प्रकार घडला. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगला आलेल्या केकेआरची सुरूवात खराब झाली. ठराविक अंतरानं त्यांच्या विकेट्स पडत होत्या. सॅम बिलिंग्ज आणि रिंकू सिंह ही जोडी बॅटींग करत असताा त्यांचा अंपायरशी वाद झाला. 12 व्या ओव्हरमध्ये टी. नटराजनच्या सुरेख यॉर्करवर रिंकू LBW असल्याचा निर्णय अंपायरनं दिला.
अंपायरच्या या निर्णयावर रिंकू असमाधानी होता. त्यानं DRS घेण्याबाबत त्याचा जोडीदार सॅम बिलिंग्जशी चर्चा केली. बिलिंग्जशी त्याला अगदी शेवटच्या क्षणी DRS घेण्याचा सल्ला दिला. अंपायरनं दिलेल्या निर्णयावर डीआरएसच्या माध्यमातून दाद मागण्यासाठी 15 सेकंद वेळ असतो. तो वेळ तोपर्यंत निघून गेला होता. त्यामुळे मैदानातील अंपायरनी रिंकूचे अपिल नाकारले. यावेळी स्वत:च केलेल्या चुकीसाठी केकेआरच्या खेळाडूंनी अंपायरशी वाद घातला.
— Addicric (@addicric) May 14, 2022
कोलकाता नाईट रायडर्सनं या सामन्यात आंद्र रसेलच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर सनरायझर्सचा 54 रननं मोठा पराभव केला. हैदराबादचा हा सलग पाचवा पराभव आहे. केकेआरचा 13 सामन्यांमधला हा सहावा विजय आहे. केकेआरनं पहिल्यांदा बॅटींग करत 6 आऊट 177 रन केले. सनरायझर्सला 178 रनचं आव्हान पेलवलं नाही. त्यांना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 आऊट 123 रन करता आले.
IPL 2022 : श्रेयस अय्यरनं पुन्हा केलं KKR च्या CEO बाबत वक्तव्य, टीम निवडीबाबत दिलं स्पष्टीकरण
आंद्रे रसलेनं 29 बॉलमध्ये नाबाद 49 रन केले. या खेळीत त्यानं 3 फोर आणि 4 सिक्स लगावले. त्यानंतर रसेलनं 22 रनमध्ये 3 विकेट्स घेत केकेआरच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. या विजयासह केकेआरचं या स्पर्धेतील आव्हान अजून कायम आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.