मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022: धोनी, रोहितनं केली नव्या करारावर स्वाक्षरी, Hitmanची स्टाईल सर्वात हटके! पाहा VIDEO

IPL 2022: धोनी, रोहितनं केली नव्या करारावर स्वाक्षरी, Hitmanची स्टाईल सर्वात हटके! पाहा VIDEO

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या आयपीाएलमधील सर्वात यशस्वी टीमनं प्रत्येकी 4 खेळाडूंना रिटेन केले आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 1 डिसेंबर : आयपीएल स्पर्धेतील 8 टीमनं पुढील सिझनपूर्वी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी (IPL 2022 Retention) जाहीर केली आहे.  आगामी मेगा ऑक्शनपूर्वी (IPL 2022 Mega Auction) या सर्व टीमनी एकूण 27 खेळाडूंना रिटेन केले आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या आयपीाएलमधील सर्वात यशस्वी टीमनं प्रत्येकी 4 खेळाडूंना रिटेन केले आहे. या टीमच्या रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंनी नव्या करारावर स्वाक्षरी केली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

IPL 2022 साठी चेन्नई सुपर किंग्सनं रवींद्र जडेजाला तब्बल 16 कोटी रुपये देत रिटेन केले आहे. तर महेंद्र सिंह धोनीला 12 कोटी आणि मोईन अलीला 8 कोटी रुपये लावून रिटेन करण्यात आले आहे. मागील आयपीएलमध्ये धडाकेबाज खेळी करणार्या ऋतुराज गायकवाडला सुद्धा 6 कोटी रुपयांमध्ये रिटेन करण्यात आले आहे. सीएसकेनं हे सर्व खेळाडू नव्या करारावर स्वाक्षरी करत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रोहित शर्मा (Rohit Sharma), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्यावर विश्वास दाखवला आहे. रोहित शर्मानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नव्या करारावर स्वाक्षरी करत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

रोहितनं या करारावर स्वाक्षरी उभं राहूनच केली आहे. त्याचबरोबर जवळ असलेल्या एका व्यक्तीला समोर उभं करत त्याच्या पाठीवर कागद ठेवून रोहितनं ही सही केली आहे. रोहित शर्माची स्वाक्षरी करण्याची  ही हटके स्टाईल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

IPL 2022: RCB नं रिटेन करताच विराट कोहलीनं दिला इशारा, म्हणाला... पाहा VIDEO

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली, पण 2021 च्या मोसमात त्यांची कामगिरी खराब झाली. मुंबई इंडियन्सना प्ले-ऑफमध्ये पोहोचता आलं नाही. हे अपयश विसरत आता नव्या प्लॅनिंगसह मुंबईची टीम पुढील आयपीएल सिझनमध्ये मैदानात उतरणार आहे.

First published:

Tags: Csk, Ipl 2022, Mumbai Indians