मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022: जम्मू काश्मीरचे 2 खेळाडू रातोरात करोडपती, दिग्गजांना मागं टाकत मारली बाजी

IPL 2022: जम्मू काश्मीरचे 2 खेळाडू रातोरात करोडपती, दिग्गजांना मागं टाकत मारली बाजी

आयपीएल 2022 मधील मेगा ऑक्शनपूर्वी (IPL 2022) रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये  नव्या दमाच्या खेळाडूंवरही फ्रँचायझींनी विश्वास दाखवला आहे.

आयपीएल 2022 मधील मेगा ऑक्शनपूर्वी (IPL 2022) रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये नव्या दमाच्या खेळाडूंवरही फ्रँचायझींनी विश्वास दाखवला आहे.

आयपीएल 2022 मधील मेगा ऑक्शनपूर्वी (IPL 2022) रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये नव्या दमाच्या खेळाडूंवरही फ्रँचायझींनी विश्वास दाखवला आहे.

मुंबई, 1 डिसेंबर: आयपीएल 2022 मधील मेगा ऑक्शनपूर्वी (IPL 2022) रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni), विराट कोहली (Virat Kohli) , रोहित शर्मा (Rohit Sharma) या अनुभवी नावांसह नव्या दमाच्या खेळाडूंवरही फ्रँचायझींनी विश्वास दाखवला आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) या टीमनं जम्मू काश्मीरच्या 2 तरूण खेळाडूंना रिटेन करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये सनरायझर्स हैदराबादची कामगिरी निराशाजनक होती. त्यांची थेट शेवटच्या क्रमांकावर घसरण झाली. आता आगामी स्पर्धेत नवी भरारी करण्यासाठी त्यांनी 3 खेळाडूंना रिटेन केले आहे. यामध्ये कॅप्टन केन विल्यमसनचा (Kane Williamson) अपेक्षेप्रमाणे समावेश आहे. त्याचबरोबर अब्दुल समद (Abdul Samad) आणि उमरान मलिक (Umran Malik) या तरुण खेळाडूंना देखील सनरायझर्सनं रिटेन केले आहे.

समद आणि उमरान हे दोघेही जम्मू काश्मीरचे खेळाडू आहेत. सनरायझर्स हैदराबादच्या टीममध्ये डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेअरस्टो, मनिष पांडे यासारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. या सर्वांना मागे टाकत त्यांना सनरायझर्सनं रिटेन केले आहे. समद आणि उमरानला प्रत्येकी 4 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे ते आता करोडपती झाले आहेत.

काश्मीर एक्स्प्रेस धडाडणार

उमरान मलिक हैदराबादच्या टीममध्ये सुरुवातीला नेट बॉलर होता. त्याला शेवटच्या टप्प्यात प्रमुख खेळाडू जखमी झाल्यानं प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली. उमराननं फक्त 3 मॅचमध्ये सर्वावर छाप टाकली आहे. त्यानं मागील आयपीएलमध्ये सर्वाधिक वेगाचा बॉल टाकण्याचा विक्रम केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये (SRH vs RCB) त्यानं 5 वेळा 150 किमी प्रती तास वेगानं बॉल टाकला. यामधील एक बॉल तर 153 किमी प्रती तास इतका होता. या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या इंडिया A टीममध्येही त्याची निवड झाली आहे.

दक्षिण आफ्रिकेत Omicron, टीम इंडियाच्या आगामी दौऱ्याबाबत गांगुलीचं मोठं वक्तव्य

अब्दुल समद हा आक्रमक बॅटर म्हणून ओळखला जातो. तो आयपीएल 2020 पासून सनरायझर्सच्या टीममध्ये आहेत. त्याचबरोबर त्यानं देशांतर्गत क्रिकेटही फटकेबाजीनं गाजवलं आहे. सातत्यानं कोसळणारी मिडल ऑर्डर ही हैदराबादची मोठी समस्या आहे. त्या समस्येवर मात करण्यासाठी टीम मॅनेजमेंटनं विल्यमससह समदवर विश्वास ठेवला आहे.

First published:
top videos

    Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction, SRH