मुंबई, 9 मे : आयपीएल 2022 मधील (IPL 2022) 54 व्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं सनरायझर्स हैदराबादचा (RCB vs SRH) 67 रननं पराभव केला. आरसीबीकडून स्पिनर हसरंगानं 5 विकेट्स घेत या विजयात निर्णायक भूमिका बजावली. तर आरसीबीचा कॅप्टन फाफ डुप्लेसिसनं (Faf du Plessis) 50 बॉलमध्ये 73 रन करत या विजयाचा पाया रचला. या मॅचमध्ये एक वेळ अशी आली होती की त्यावेळी डुप्लेलिस स्वत:हून आऊट होण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंच मॅच संपल्यानंतर याचा खुलासा केला आहे. फाफनं मॅचनंतर सांगितले की, ‘प्रामाणिकपणे सांगायचं तर मी आऊट होण्याचा प्रयत्न करत होतो. मी बराच थकलो होतो. दिनेश कार्तिकनं क्रिझवर यावं अशी माझी इच्छा होती. मी रिटायर्ड आऊट होण्याचाही विचार करत होतो. पण, त्याचवेळी आम्ही विकेट गमावली आणि दिनेश कार्तिक मैदानात आला. तो नेहमी प्रमाणेच जबरदस्त फॉर्ममध्ये होता.’ असा खुलासा फाफनं केला. कार्तिकची आक्रमक खेळी दिनेश कार्तिकनं समरायझर्स विरूद्ध आक्रमक खेळी करत टीमचा स्कोर 190 च्या पुढे नेला. त्यानं फक्त 8 बॉलमध्ये नाबाद 30 रन केले. यामध्ये 4 सिक्स आणि 1 फोरचा समावेश होता. कार्तिकनं तब्बल 375 च्या स्ट्राईक रेटनं रन केले. त्याच्या फटकेबाजीमुळेच आरसीबीनं 8 आऊट 192 पर्यंत मजल मारली. हैदराबादला हे आव्हान पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम 125 रनवरच ऑल आऊट झाली. धोनीच्या सल्ल्यानं बदललं CSK खेळाडूचं आयुष्य, प्रत्येक मॅचमध्ये करतोय कमाल सीएसकेनं केली मदत या विजयानं आरसीबीच्या रन रेटमध्येही सुधारणा झाली आहे.या मॅचपूर्वी आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये 2 पॉईंट्सचं अंतर होतं. आता आरसीबीचे 14 पॉईंट्स झाले असून हैदराबादचे 10 पॉईंट्सच आहेत. त्यामुळे दोन्ही टीममध्ये आता 4 पॉईंट्सचं अंतर आहे. तर सीएसकेच्या विजयाचाही आरसीबीला फायदा झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे सध्या 10 पॉईंट्स आहेत. पण, त्यांचा रन रेट हा आरसीबीपेक्षा चांगला आहे. दिल्लीनं सीएसकेचा पराभव केला असता तर दोन टीममध्ये फक्त 2 पॉईंट्सचे अंतर उरले असते. हे अंतर पार करणे अवघड नाही. कारण, दिल्लीनं आरसीबीपेक्षा एक मॅच कमी खेळली आहे. त्याचबरोबर दिल्लीचा वाढता रनरेट देखील आरसीबीसाठी डोकेदुखी ठरला असता. पण, सीएसकेनं दिल्लीचा पराभव करत आरसीबीची मोठी डोकेदुखी कमी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.