मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

धोनीच्या सल्ल्यानं बदललं CSK खेळाडूचं आयुष्य, प्रत्येक मॅचमध्ये करतोय कमाल

धोनीच्या सल्ल्यानं बदललं CSK खेळाडूचं आयुष्य, प्रत्येक मॅचमध्ये करतोय कमाल

महेंद्रसिंह धोनीकडे (MS Dhoni) सीएसकेची कॅप्टनसी पुन्हा आल्यानंतर टीमचा खेळ बदलला आहे. चेन्नईनं रविवारच्या मॅचमध्ये दिल्लीचा 91 रननं मोठा पराभव केला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 9 मे : महेंद्रसिंह धोनीकडे (MS Dhoni) सीएसकेची कॅप्टनसी पुन्हा आल्यानंतर टीमचा खेळ बदलला आहे. चेन्नईनं रविवारच्या मॅचमध्ये दिल्लीचा 91 रननं मोठा पराभव केला आहे. या विजयानंतर चेन्नईच्या रनरेटमध्ये चांगलीच वाढ झाली असून टीमची 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करण्याची आशा अजूनही कायम आहे. चेन्नईच्या दिल्लीवरील विजयात ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे (Devon Conway) या जोडीचा मोठा वाटा होता. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 110 रनची भागिदारी केली. या जोडीची या सिझनमधील ही दुसरी शतकी भागिदारी आहे. कॉनवेनं यावेळी सलग तिसरं अर्धशतक झळकावलं. त्याचं शतक हुकलं. पण, त्यानं 87 रन करत टीमला 200 च्या पार पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

दिल्ली विरूद्ध ऋतुराज गायकवाडनं फास्ट बॉलर्स विरूद्ध फटकेबाजी केली. तर कॉनवेनं स्पिनर्सची धुलाई केली. त्यानं अक्षर पटेलच्या ओव्हरमध्ये सलग दोन सिक्स लगावले. तर कुलदीप यादवच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 2 सिक्स आणि एक फोर लगावला. कॉनवेनं दिल्लीच्या स्पिनर्स विरूद्ध 20 बॉलमध्ये 54 रन केले.

कॉनवेनं दिल्ल विरूद्धच्या यशाचं श्रेय महेंद्रसिंह धोनीला दिलं आहे. धोनीनं मॅचपूर्वी सल्ला दिला होता. मी त्याची अंमलबजावणी केली. स्पिन बॉलर्सच्या विरूद्ध क्रिझच्या बाहेर येऊन शॉट्स लगावले. तसंच वेळ पडल्यावर रिव्हर्स स्वीप देखील लगावले. या पद्धतीनं फटकेबाजी करत कॉनवेनं स्पिनर्सची लाईन अँड लेन्थ खराब केली.

IPL 2022 : मैदानात येण्यापूर्वी धोनी बॅट का खातो? जुन्या सहकाऱ्यानं केला खुलासा

कॉनवे मॅचनंतर बोलताना म्हणाला की, 'मी खेळीचं श्रेय महेंद्रसिंह धोनीला देईन. मागच्या मॅचमध्ये मी अनेक स्वीप शॉट्स खेळले. पण, दुर्दैवानं मी तसाच शॉट खेळताना आऊट झालो. दिल्लीच्या मॅचपूर्वी धोनीनं मला फुल लेन्थ बॉलवर क्रिझच्या बाहेर येऊन शॉट्स मारण्याचा प्रयत्न कर असं सांगितलं. धोनीनं मला मार्ग दाखवला. मी त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला,' असे कॉनवेनं सांगितलं.

First published:

Tags: Csk, Delhi capitals, Ipl 2022, MS Dhoni