मुंबई, 27 एप्रिल : राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगोलरचा 29 रननं पराभव केला. राजस्थाननं या विजयासह आयपीएल 2022 मधील पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर उडी मारली आहे. राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनला (Sanju Samson) या मॅचमध्ये मोठी खेळी करण्यात अपयश आलं. चांगल्या सुरूवातीनंतर संजू 27 रनवर आऊट झाला. संजूला आरसीबीचा स्पिनर हसरंगानं बोल्ड केलं. संजूनं या इनिंगमध्ये हसरंगाला एक सिक्स लगावला. पण, तो त्याच्या विरूद्ध सहज खेळू शकला नाही. त्यानं हसरंगला पुन्हा एकदा विकेट दिली. संजू सॅमसनला हसरंगा विरूद्ध आजवर नेहमीच झगडावं लागलं आहे. संजूनं हसरंगाचा आजवर 23 बॉल सामना केला असून त्यामध्ये तो पाच वेळा आऊट झाला आहे. मंगळवारी पुन्हा एकदा हसरंगा विरूद्ध फेल गेल्यानंतर संजूला सोशल मीडियाव चांगलेच ट्रोल करण्यात आले.
Whenever Hasranga comes to bowl#RCBvsRR
— Manoj Pareek (@mrpareekji) April 26, 2022
* Sanju Samson : pic.twitter.com/NlGW0kqFJp
#RRvRCB #RRVSRCB
— Anonymous9726 (@Anonymous97261) April 26, 2022
everytime Wanindu Hasaranga comes to bowl,
Meanwhile Sanju Samson : pic.twitter.com/wCZrNsdju1
When your next task is to score against @Wanindu49 Wanindu Hasaranga..#RCBvsRR @rajasthanroyals
— Gautam singh Rajpoot (@AnonymousMemer0) April 26, 2022
Sanju Samson: pic.twitter.com/l5TGnfXjve
Hasranga ---- Official holder of Sanju Samson pic.twitter.com/S0n3ovDl74
— Neelav (@j_neelav) April 26, 2022
20 वर्षांचा रियान पराग (Riyan Parag) राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. . त्यानं या सामन्यात 31 बॉलमध्ये नाबाद 56 रनची खेळी केली. त्याचबरोबर 4 कॅच देखील घेतल्या. परागनं यावेळी अॅडम गिलख्रिस्ट, जॅक कॅलिस यांच्या रेकॉर्डची बरोबरी केली. हा रेकॉर्ड करणारा तो आयपीएलच्या इतिहासातील तिसरा आणि पहिलाच भारतीय खेळाडू आहे. परागनं विराट कोहली, सूयश प्रभूदेसाई, शाहबाज नदीम आणि हर्षल पटेल या चौघांचे कॅच घेतले. इंग्लंड क्रिकेट टीमचे कोच होणार का? गुगली प्रश्नावर रवी शास्त्रींनी दिले थेट उत्तर आरसीबीविरुद्धच्या या विजयासोबतच राजस्थान पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर गेली आहे. राजस्थानने 8 पैकी 6 मॅचमध्ये विजय मिळवला तर 2 मॅचमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं आहे. आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे, त्यांनी 9 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला.