जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / इंग्लंड क्रिकेट टीमचे कोच होणार का? गुगली प्रश्नावर रवी शास्त्रींनी दिले थेट उत्तर

इंग्लंड क्रिकेट टीमचे कोच होणार का? गुगली प्रश्नावर रवी शास्त्रींनी दिले थेट उत्तर

इंग्लंड क्रिकेट टीमचे कोच होणार का? गुगली प्रश्नावर रवी शास्त्रींनी दिले थेट उत्तर

इंग्लंड क्रिकेट टीमचे कोच ख्रिस सिल्व्हरवूड यांनी राजीनामा दिल्यानंतर ते पद रिकामं आहे. इंग्लंडचे कोच होणार का? असा प्रश्न रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना विचारण्यात आला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 एप्रिल : टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) सध्या आयपीएल स्पर्धेत कॉमेंट्री करत आहेत. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची इनिंग संपल्यानंतर त्यांनी आयपीएल स्पर्धेपासून पुन्हा एकदा कॉमेंट्री करण्यास सुरूवात केली आहे. रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात भारतीय टीमनं ऑस्ट्रेलियामध्ये दोन वेळा पराभव केला आहे. हा एक रेकॉर्ड आहे. इंग्लंड (England) क्रिकेट टीमचे कोच ख्रिस सिल्व्हरवूड यांनी राजीनामा दिल्यानंतर ते पद रिकामं आहे. इंग्लंडचे कोच होणार का? असा प्रश्न शास्त्री यांना विचारण्यात आला होता. ‘द गार्डियन’ या ब्रिटीश वृत्तपत्राला शास्त्री यांनी नुकतीच मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांना इंग्लंड क्रिकेट टीमचे कोच होण्यात रस आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर शास्त्री यांनी, ‘अजिबात नाही. त्या रस्त्यावर जाऊ नका. भारतीय टीमबरोबर सात वर्ष राहिल्यानंतर मला इंग्लंड क्रिकेट टीमचा मुख्य कोच होण्याची कोणतीही इच्छा नाही.’ असे स्पष्ट केले. बेन स्टोक्सला इंग्लंड टीमचं कॅप्टन केलं तर त्याच्या कामगिरीमध्ये आणखी सुधारणा होईल, असं मत शास्त्रींनी व्यक्त केलं. खराब कालखंडामधून जात असलेल्या इंग्लंड टीममध्ये स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांना परत आणलं पाहिजे. त्यांच्या अनुभवाला कोणताही पर्याय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अँडरसन-ब्रॉड ही इंग्लंडची सर्वात यशस्वी फास्ट बॉलर्सची जोडी आहे. त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 1177 विकेट्स घेतल्या. IPL 2022 : 11 कोटींच्या खेळाडूनं घालवली लाज, राजस्थान विरूद्ध केला नकोसा रेकॉर्ड शास्त्री यांच्या कारकिर्दीमध्ये टीम इंडियानं 14 पैकी 10 टेस्ट सीरिज जिंकल्या. यामध्ये ऑस्ट्रेलियात मिळालेल्या 2 मालिका विजयांचाही समावेश आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये भारतीय टीम टेस्टमध्ये नंबर 1 देखील बनली होती. दुसरिकडं ऑस्ट्रेलिया विरूद्धची सीरिज 0-4 या फरकाने गमावल्यानंतर कोच ख्रिस सिल्व्हरवूड यांना पदावरून जावं लागलं. तसंच इंग्लंड टेस्ट टीमचा कॅप्टन जो रूट यानंही टीमच्या निराशाजनक कामगिरीनंतर राजीनामा दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात