मुंबई, 27 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Delhi Capitals vs Rajasthan Royals) यांच्यातील सामन्याला आता चार दिवस उलटले आहेत. त्यानंतरही शेवटच्या ओव्हरमध्ये झालेल्या नो बॉल वादाचे (No Ball Controversy) पडसाद अजूनही उमटत आहेत. राजस्थानच्या ओबेड मेकॉयनं टाकलेल्या शेवटच्या ओव्हरमधील तिसरा बॉल ‘नो बॉल’ होता असा दिल्ली कॅपिटल्सचा दावा होता. अंपायरनं तो न दिल्यानं कॅप्टन ऋषभ पंत (Rishabah Pant) चांगलाच नाराज झाला. त्याने खेळाडूंना परत येण्याची सूचना केली. तर, दिल्लीचे सहाय्यक प्रशिक्षक प्रविण आम्रे यांनी या प्रकरणात मैदानात धाव घेतली होती. मैदानात हा ड्रामा सुरू इसताना बॅटींग करत असलेल्या रोव्हमन पॉवेलनं (Rovman Powell) या प्रकरणावर मत व्यक्त केले आहे. ‘खरं सांगयाचं तर एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारण्याची मला खात्री होती. पहिल्या दोन बॉलवर सिक्स मारल्यानंतर आपण असं करू शकतो, असं मला वाटलं होतं. तो नो बॉल असेल अशी आशा मी करत होतो. पण, अंपायरचा निर्णय शेवटचा असतो. क्रिकेटपटू म्हणून आम्हाला आता पुढं गेलं पाहिजे. या सर्व गोष्टी आता आम्हाला मागं सोडाव्या लागतील. आम्हाला अजून बरेच सामने खेळायचे आहेत. आता भूतकाळाचा विचार करण्यात काही अर्थ नाही. या स्पर्धेच्या पुढील फेरीत क्वालिफाय करण्यासाठी नेहमीच भविष्याचा विचार करावा लागेल,’ असं पॉवेलनं स्पष्ट केलं. पंत- आम्रेंना शिक्षा आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या ऋषभ पंत, शार्दूल ठाकूर आणि प्रविण आमरे यांना त्यांनी शिक्षा सुनावली आहे. या सर्व प्रकाराबद्दल पंतचे राजस्थान विरूद्धच्या मॅचचे शंभर टक्के मानधन कापण्यात येणार आहे. पंतला साथ देत हात वर करणाऱ्या शार्दुल ठाकूरचे 50 टक्के मानधन कापण्यात येणार असून आमरेंवर मॅच फिसची शंभर टक्के रक्कम आणि एका मॅचची बंदी घालण्यात आली आहे. IPL 2022 : RCB ची हाराकिरी सुरूच, राजस्थानचा ‘रॉयल’ विजय दिल्ली कॅपिटल्सचे सात मॅचनंतर 3 विजय आणि 4 पराभवासह 6 पॉईंट्स आहेत. सध्या पॉईंट टेबलमध्ये ही टीम सातव्या क्रमांकावर आहे. दिल्लीची पुढील लढत कोलकाता नाईट रायडर्सची (DC vs KKR) गुरूवारी होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.