मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : राजस्थानला राहावं लागणार सावधान! RCB च्या 2 बॉलर्सचा संजूला धोका

IPL 2022 : राजस्थानला राहावं लागणार सावधान! RCB च्या 2 बॉलर्सचा संजूला धोका

RR vs RCB: राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसननं (Sanju Samson) या आयपीएल सिझनमध्ये चांगली बॅटींग केली आहे. त्याला आरसीबी विरूद्ध दोन बॉलर्सपासून सावध राहावं लागेल.

RR vs RCB: राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसननं (Sanju Samson) या आयपीएल सिझनमध्ये चांगली बॅटींग केली आहे. त्याला आरसीबी विरूद्ध दोन बॉलर्सपासून सावध राहावं लागेल.

RR vs RCB: राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसननं (Sanju Samson) या आयपीएल सिझनमध्ये चांगली बॅटींग केली आहे. त्याला आरसीबी विरूद्ध दोन बॉलर्सपासून सावध राहावं लागेल.

मुंबई, 27 मे : आयपीएल 2022 च्या फायनलमध्ये (IPL 2022 Final) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध कोणती टीम खेळेल याचा निर्णय आज (शुक्रवार) होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये राजस्थान रॉयल्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RR vs RCB) ही दुसरी क्वालिफायर आज होणार आहे. राजस्थानचा क्वालिफायर वनमध्ये गुजरातनं पराभव केला होता. पण, पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असल्यानं त्यांना फायनलमध्ये जाण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. तर, आरसीबीनं लखनऊचा पराभव करत दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे.

राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसननं (Sanju Samson) या आयपीएल सिझनमध्ये चांगली बॅटींग केली आहे. त्यानं जोस बटलरनंतर (718) राजस्थानकडून सर्वाधिक रन केले आहेत. त्यानं आत्तापर्यंत 15 सामन्यांमध्ये 421 रन केले असून यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. पण, बँगलोरकडं सॅमसनला रोखण्यासाठी एक नाही तर दोन-दोन शस्त्र आहेत.

आरसीबीकडील पहिला हुकमी एक्का आहे वानिंदू हसरंगा. श्रीलंकेच्या लेग स्पिनरनं सॅमसनला नेहमीच सतावलंय.हसरंगानं 6 टी20 इनिंगमध्ये 5 वेळा सॅमसनला आऊट केलंय. राजस्थानच्या कॅप्टननं हसरंगा विरूद्ध 23 बॉलमध्ये फक्त 18 रन केले आहेत. त्यामुळे त्याला या सामन्यात विशेष सावध राहावं लागणार आहे. सॅमसनसाठी फक्त हसरंगा ही एकच डोकेदुखी नाही. तर मोहम्मद सिराजचाही रेकॉर्ड त्याच्या विरूद्ध चांगला आहे. सिराज विरूद्ध सॅमसननं 20 बॉलमध्ये 21 रन काढले असून तो 2 वेळा आऊट झाला आहे. त्यामुळे सॅमसनला हसरंगा आणि सिराज विरूद्ध सावध खेळावं लागेल.

कुत्र्याला स्टेडिअममध्ये फिरवणे महागात, IAS अधिकाऱ्याची लडाखमध्ये तर पत्नीची अरूणाचल प्रदेशमध्ये बदल

राजस्थान विरूद्ध आरसबी मॅचमध्ये हसरंगाची सॅमसनसह युजवेंद्र चहलशी लढत रंगणार आहे. हसरंगानं आत्तापर्यंत 15 मॅचमध्ये 16.16 च्या सरासरीनं 25 विकेट्स घेतल्या आहेत. तो युजवेंद्र चहलपेक्षा (26) फक्त 1 विकेटनं मागं आहे. त्यामुळे पर्पल कॅप पटकावण्यासाठी हा सामना दोन्ही बॉलर्ससाठी महत्त्वाचा आहे.

First published:

Tags: Ipl 2022, Rajasthan Royals, RCB, Sanju samson