— Bleh (@rishabh2209420) May 19, 2022विराटनं गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध 54 बॉलमध्ये 73 रनची खेळी केली. या आयपीएल सिझनमधील विराटचं हे दुसरं अर्धशतक आहे. विशेष म्हणजे त्यानं दोन्ही अर्धशतक गुजरात टायटन्स विरूद्धच झळकावली आहेत. गुजरातने दिलेलं 169 रनचं आव्हान आरसीबीने 18.4 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून पार केलं. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस यांच्यात 115 रनची पार्टनरशीप झाली.आरसीबीकडून विराट कोहलीने 54 बॉलमध्ये 73 रनची खेळी केली, तर डुप्लेसिस 38 बॉलमध्ये 44 रन करून आऊट झाला. ग्लेन मॅक्सवेलने 18 बॉलमध्ये नाबाद 40 रन केले. IPL 2022 : ड्रेसिंग रूममधील आदळ आपट Mathew Wade ला महागात, मिळाली चुकीची शिक्षा गुजरात टायटन्सवरील विजयानंतरही आरसीबीला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) अवलंबून राहावं लागणार आहे. मुंबई आणि दिल्ली यांच्यात शनिवारी महत्त्वाचा सामना होणार आहे. या सामन्यात मुंबईचा विजय झाला तर आरसीबी प्ले-ऑफमध्ये पोहोचेल, पण जर मुंबईने हा सामना गमावला तर मात्र आरसीबीच्या प्ले-ऑफला पोहचण्याच्या स्वप्नांचा चुराडा होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujarat Titans, Ipl 2022, RCB, Virat kohli