जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : RCB च्या स्टार खेळाडूच्या बहिणीचं निधन, आयपीएल सोडून तातडीनं घरी रवाना

IPL 2022 : RCB च्या स्टार खेळाडूच्या बहिणीचं निधन, आयपीएल सोडून तातडीनं घरी रवाना

IPL 2022 : RCB च्या स्टार खेळाडूच्या बहिणीचं निधन, आयपीएल सोडून तातडीनं घरी रवाना

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं शनिवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा (MI vs RCB) 7 विकेट्सनं पराभव केला. ही मॅच सुरू असतानाच आरसीबीला एक मोठा धक्का बसला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं शनिवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा (MI vs RCB) 7 विकेट्सनं पराभव केला.  मुंबईनं दिलेलं 152 रनचं आव्हान आरसीबीनं 19 व्या ओव्हरमध्येच 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. आरसीबीचा या स्पर्धेतील हा तिसरा विजय असून त्यांनी पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे. मुंबई विरूद्धची मॅच सुरू असतानाच आरसीबीला एका वाईट बातमीनं धक्का बसला आहे. आरसीबीचा फास्ट बॉलर हर्षल पटेलच्या (Harshal Pate) बहिणीचं निधन झालं आहे.  शनिवारी मुंबई इंडियन्स विरूद्धची मॅच सुरू असताना हर्षलची बहिण अर्चिता पटेलचं निधन झालं आहे. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. ही बातमी समजताच हर्षल तातडीनं आयपीएल स्पर्धा सोडून घरी परतला आहे. हर्षल गुजरातच्या साणंदचा राहणारा आहे. बहिणीच्या निधनाचं वृत्त समजताच तो पुण्याहून अहमदाबादला रवाना झाला. तो एक दिवसानंतर पुन्हा टीममध्ये परतेल. आयपीएल स्पर्धेतील बायो-बबलच्या नियमानुसार हर्षल पटेलला परत आल्यावर तीन दिवस क्वारंटाईन राहावं लागेल. आरसीबीची पुढील मॅच मंगळवारी (12 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध होणार आहे. ही मॅच हर्षल खेळणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. हर्षलनं शनिवारी भेदक बॉलिंग करत आरसीबीच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये धोकादायक ठरत असलेल्या रोहित शर्माला आऊट केले. हर्षलनं मुंबई इंडियन्स विरूद्ध चार ओव्हर्समध्ये फक्त 23 रन देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. फॉर्मातील हर्षलची अनुपस्थिती सीएसके विरूद्ध आरसीबीला जाणवणार आहे. IPL 2022, KKR vs DC Dream 11: आंद्रे रसेलला करा कॅप्टन, ‘या’ 11 खेळाडूंवर आजमवा भविष्य आरसीबीकडून अनुज रावतने 47 बॉलमध्ये 66 रनची खेळी केली, यात 2 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. ग्लेन मॅक्सवेलने लागोपाठ 2 बॉलला 2 फोर मारून आरसीबीला विजय मिळवून दिला. मुंबईकडून जयदेव उनाडकट आणि डेवाल्ड ब्रेविसला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली, तर अनुज रावतला रमणदीप सिंगने रन आऊट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात