जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022, KKR vs DC Dream 11: आंद्रे रसेलला करा कॅप्टन, 'या' 11 खेळाडूंवर आजमवा भविष्य

IPL 2022, KKR vs DC Dream 11: आंद्रे रसेलला करा कॅप्टन, 'या' 11 खेळाडूंवर आजमवा भविष्य

IPL 2022, KKR vs DC Dream 11: आंद्रे रसेलला करा कॅप्टन, 'या' 11 खेळाडूंवर आजमवा भविष्य

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज (रविवारी) डबल हेडर होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3.30 वाजता कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (KKR vs DC) यांच्यात होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 एप्रिल : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज (रविवारी) डबल हेडर होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3.30 वाजता कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (KKR vs DC) यांच्यात होत आहे. केकेआरनं या सिझनमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी 4 पैकी 3 मॅच जिंकल्या असून पॉईंट टेबलमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. तर ऋषभ पंतच्या (Rishbah Pant) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा मागील दोन मॅचमध्ये पराभव झाला आहे. त्यामुळे त्यांना केकेआर विरूद्ध विजय मिळवत पुन्हा एकदा टॉप 4 च्या शर्यतीमध्ये दावेदारी सादर करायची आहे. केकेआरचा ऑल राऊंडर आंद्रे रसेलनं या स्पर्धेत चांगली कमगिरी केली आहे. त्याने पंजाब किंग्ज विरूद्ध 31 बॉलमध्ये नाबाद 70 रन केले होते. रसेलचा दिल्ली विरूद्धचाही रेकॉर्ड चांगला आहे. त्यामुळे तो तुमच्या Dream 11 टीमच्या कॅप्टनपदासाठी चांगला पर्याय आहे. मुंबई इंडियन्स विरूद्ध पॅट कमिन्सनं आक्रमक बॅटींग करत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकाची बरोबरी केली आहे. तर उमेश यादव सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या शर्यतीमध्ये आघाडीवर आहे. दिल्लीकडंही मॅच विनर खेळाडू आहेत. पृथ्वी शॉ ने लखनऊ विरूद्धच्या मॅचमध्ये आक्रमक अर्धशतक झळकावलं आहे. डेव्हिड वॉर्नर दिल्लीकडून मोठी इनिंग करण्यासाठी उत्सुक आहे. कॅप्टन ऋषभ पंतमध्ये एकहाती मॅच फिरवण्याची क्षमता आहे. तर स्पिनर कुलदीप यादवही सध्या फॉर्मात असून तो जुन्या टीम विरूद्ध कशी कामगिरी करतो याकडं सर्वांचं लक्ष आहे. दिनेश कार्तिकची बायकोही चॅम्पियन, आई झाल्यानंतर 6 महिन्यांमध्ये जिंकले 2 गोल्ड मेडल KKR vs DC Dream 11 Team Prediction कॅप्टन: आंद्रे रसेल व्हाईस कॅप्टन: सुनील नरीन विकेटकीपर: ऋषभ पंत, सॅम बिलिंग्स बॅटर: पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, डेविड वॉर्नर ऑल राउंडर: व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल बॉलर: उमेश यादव, कुलदीप यादव.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात