पूजानं या मॅचमध्ये या स्पर्धेतील सर्वात लांब सिक्स लगावला. 49 व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर तिनं हा सिक्स मारला. ऑस्ट्रेलियन बॉलरनं टाकलेल्या बॉलवर पूजानं सर्व शक्ती लावून लाँग ऑनला सिक्स लगावला. तिनं मारलेल्या सिक्सनं 81 मीटर अंतर पार केले. यापूर्वी भारताच्याच स्मृती मंधानानं 80 मीटर सिक्स मारला होता. पूजानं त्यापेक्षाही लांब सिक्स लगावला. IND vs AUS : 'वर्ल्ड कप क्वीन'ची दमदार खेळी, टीम इंडियाचं ऑस्ट्रेलियाला आव्हानात्मक टार्गेट क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये नेहमीच चांगलं खेळण्यासाठी ओळखळ्या जाणाऱ्या हरमनं या मॅचमध्ये आक्रमक अर्धशतक. तिने 47 बॉलमध्ये 6 फोरच्या मदतीनं नाबाद 57 रन केले. हरमननं 2017 साली झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध 171 रनची ऐतिहासिक खेळी केली होती. त्यानंतर तिने या वर्ल्ड कपमध्येही ऑस्ट्रेलियन बॉलर्सना टार्गेट केले. तर भारतीय इनिंगच्या शेवटच्या बॉलवर रन आऊट होण्यापूर्वी पूजानं 28 बॉलमध्ये 1 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 34 रन काढले होते.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.