मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : 3 कारणांमुळे जडेजाच्या जागी धोनी पुन्हा झाला CSK चा कॅप्टन

IPL 2022 : 3 कारणांमुळे जडेजाच्या जागी धोनी पुन्हा झाला CSK चा कॅप्टन

रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) सीएसकेच्या कॅप्टनसीचा राजीनामा दिला आहे. त्याच्या जागी पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) कॅप्टनपदी निवड झाली आहे. धोनीच्या निवडीची 3 प्रमुख कारणं आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 1 मे : आयपीएल स्पर्धा सुरू असतानाच चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कॅप्टन बदलला आहे. रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) सीएसकेच्या कॅप्टनसीचा राजीनामा दिला आहे. त्याच्या जागी पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) कॅप्टनपदी निवड झाली आहे. धोनीनं हा सिझन सुरू होण्याच्या दोन दिवस आधी कॅप्टनपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर जडेजाची या पदावर नियुक्ती झाली होती. पण, आता महिनाभरातच सीएसकेच्या कॅप्टनपदी पुन्हा एकदा धोनीची नियुक्ती होण्याची 3 प्रमुख कारणं आहेत

सीएसकेची खराब कामगिरी

चेन्नई सुपर किंग्स ही आयपीएल स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाची यशस्वी टीम आहे. सीएसकेनं आत्तापर्यंत 4 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. त्यामध्ये मागच्या वर्षीच्या (IPL 2021) आयपीएल विजेतेपदाचाही समावेश आहे. या सिझनमध्ये मात्र सीएसकेची कामगिरी निराशाजनक झाली आहे. पहिल्या 8 पैकी फक्त 2 मॅचमध्ये सीएसकेचा विजय झाला असून 6 मॅचमध्ये पराभव झाला आहे.

सीएसकेची टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. या टीमचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याचा धोका वाढला आहे. सीएसकेच्या या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारून जडेजानं राजीनामा दिलाय, असं मानलं जात आहे.

जडेजाच्या कामगिरीवर परिणाम

रविंद्र जडेजा हा टीम इंडियाचा नंबर 1 ऑल राऊंडर आहे. तो गेल्या काही वर्षांपासून बॅट आणि बॉलनं दमदार कामगिरी करतोय. आयपीएलपूर्वी झालेली श्रीलंका विरूद्धची टेस्ट सीरिज देखील जडेजानं गाजवली होती. तसंच मागील वर्षी चेन्नईनं मिळवलेल्या विजतेपदामध्येही जडेजाच्या ऑल राऊंड खेळाचा मोठा वाटा होता.

जडेजाच्या खेळावर कॅप्टनीसाचा परिणाम या सिझनमध्ये स्पष्ट दिसला. जडेजानं 8 मॅचमध्ये फक्त 112 रन केले आहेत. तसंच 5 विकेट्स घेतल्या आहेत. सीएसकेच्या एकूण कामगिरीवरही जडेजाच्या खराब फॉर्मचा परिणाम होत आहे.

IPL 2022 : हूश्श, जिंकले एकदाचे! मुंबईचा पहिला विजय, रोहितला बर्थडे गिफ्ट!

धोनीवर शेवटची आशा

महेंद्रसिंह धोनी हा चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या सिझनपासून कॅप्टन होता. सीएसकेनं चारही आयपीएल विजेतेपदं ही धोनीच्याच कॅप्टनसीमध्ये जिंकली आहेत. सीएसके सध्या पॉईंट टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. पण, अजूनही त्यांची 'प्ले ऑफ' गाठण्याची आशा संपलेली नाही. त्यांना आता उर्वरित प्रत्येक मॅच जिंकणे आवश्यक आहे. या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सीएसकेसाठी धोनी ही  शेवटची आशा आहे. त्यामुळे देखील जडेजाच्या जागी धोनीची पुन्हा कॅप्टनपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

First published:

Tags: Csk, Ipl 2022, MS Dhoni, Ravindra jadeja