जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : हूश्श, जिंकले एकदाचे! मुंबईचा पहिला विजय, रोहितला बर्थडे गिफ्ट!

IPL 2022 : हूश्श, जिंकले एकदाचे! मुंबईचा पहिला विजय, रोहितला बर्थडे गिफ्ट!

Photo-Mumbai Indians/Twitter

Photo-Mumbai Indians/Twitter

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians vs Rajasthan Royals) अखेर पहिला विजय झाला आहे. राजस्थानने दिलेलं 159 रनचं आव्हान मुंबईने 19.2 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पार केलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी मुंबई, 30 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians vs Rajasthan Royals) अखेर पहिला विजय झाला आहे. राजस्थानने दिलेलं 159 रनचं आव्हान मुंबईने 19.2 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पार केलं. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आल्यानंतर रोहित शर्मा 2 रन करून आऊट झाला, तर इशान किशनने (Ishan Kishan) 18 बॉलमध्ये 26 रनची खेळी केली. पहिल्या दोन विकेट गेल्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि तिलक वर्मा (Tilak Varma) यांनी मुंबईचा डाव सावरला. सूर्याने 39 बॉलमध्ये 51 आणि तिलकने 35 रन केले. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा एकत्रच आऊट झाल्यानंतर मुंबईचं टेन्शन पुन्हा वाढलं होतं, पण टीम डेव्हिडने राजस्थानच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. 9 बॉलमध्ये 20 रनवर डेव्हिड नाबाद राहिला. शेवटच्या ओव्हरमध्ये मुंबईला विजयासाठी 4 रनची गरज होती, तेव्हा पहिल्याच बॉलला पोलार्ड आऊट झाला, पण डॅनियल सॅम्सने पहिल्याच बॉलला सिक्स मारून मुंबईला मोसमातला पहिलाच विजय मिळवून दिला. राजस्थानकडून बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, आर.अश्विन, चहल आणि कुलदीप सेन यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांनी राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 158/6 वर रोखलं. जॉस बटलरची बॅट पुन्हा एकदा मुंबईविरुद्ध तळपली. याआधी मुंबईविरुद्ध शतक करणाऱ्या बटलरने यंदा अर्धशतकी खेळी केली. 52 बॉलमध्ये 67 रनची खेळी करून बटलर आऊट झाला, त्याच्या या खेळीमध्ये 4 सिक्सचा समावेश होता. जॉस बटलर वगळता राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला मोठा स्कोअर करता आला नाही. रिले मेरेडिथने शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 3 रनच दिले. मुंबईकडून ऋतिक शौकीन आणि रिले मेरेडिथ यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर डॅनियल सॅम्स आणि कुमार कार्तिकेय यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात