Home /News /news /

Ashleigh Barty Retires : वर्ल्ड नंबर 1 टेनिसपटूची 25 व्या वर्षीच अचानक निवृत्ती!

Ashleigh Barty Retires : वर्ल्ड नंबर 1 टेनिसपटूची 25 व्या वर्षीच अचानक निवृत्ती!

जगातील नंबर 1 महिला टेनिसपटू एश्ले बार्टीनं (Ashleigh Barty) फॅन्सना मोठा धक्का दिला आहे. बार्टीनं अचानक व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होणार असल्याचा (Ashleigh Barty retires) निर्णय जाहीर केला आहे.

  मुंबई, 23 मार्च : जगातील नंबर 1 महिला टेनिसपटू एश्ले बार्टीनं (Ashleigh Barty) फॅन्सना मोठा धक्का दिला आहे. बार्टीनं अचानक व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होणार असल्याचा  (Ashleigh Barty retires) निर्णय जाहीर केला आहे. बार्टीनं सोशल मीडियावर व्हिडीओ मेसेज शेअर करत याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत घोषणा करणार असल्याचं तिनं जाहीर केलं आहे. 25 वर्षांच्या एश्ले बार्टीनं इन्स्टाग्रामवर व्हिडीओ मेसेज शेअर करत म्हणाली की, 'आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय अवघड आणि भावनिक आहे. मी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा करत आहे. ही बातमी तुमच्याशी कशी शेअर करावी हे मला समजत नव्हतं. त्यामुळे मी माझी चांगल्या मैत्रिणीची मदत घेत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Ash Barty (@ashbarty)

  या खेळानं मला जे काही दिलं त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला त्याचा अभिमान आहे. या वाटचालीमध्ये मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार. तुमच्यासोबतच्या त्या अविस्मरणीय आठवणी मी कधीही विसरणार नाही. ' 3 वेळा ग्रँडस्लॅम जिंकणारी एश्ले बार्टी ऑस्ट्रेलियातील आहे. तिनं याचवर्षी महिला एकेरीमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे. IPL 2022 : आयपीएलमधून मिळणार टीम इंडियाला कॅप्टन, शास्त्रींनी सांगितली 3 संभाव्य नावं बार्टीनं ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बलडन स्पर्धा प्रत्येकी एक वेळा जिंकली आहे. तिने 2019 साली फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली त्यानंतर 2021 मध्ये विम्बल्डन आणि यावर्षी म्हणजे 2022 साली ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचं विजतेपद पटकावलं होतं. तिनं ऑलिम्पिक स्पर्धेतही ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Australia, Sports, Tennis player

  पुढील बातम्या