मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022: अश्विन आणि धोनी पुन्हा येणार एकत्र? दिग्गज स्पिनरनं ऑक्शनपूर्वी दिले संकेत

IPL 2022: अश्विन आणि धोनी पुन्हा येणार एकत्र? दिग्गज स्पिनरनं ऑक्शनपूर्वी दिले संकेत

आर. अश्विनला (R. Ashwin) आयपीएल 2022 साठी दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) रिटेन केलेले नाही. त्यामुळे तो आता पुन्हा एकदा मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) दिसणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 18 डिसेंबर : आर. अश्विनला (R. Ashwin) आयपीएल 2022 साठी दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) रिटेन केलेले नाही. त्यामुळे तो आता पुन्हा एकदा मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) दिसणार आहे. पुढील सिझनमध्ये कोणत्या आयपीएल टीमकडून खेळण्याची इच्छा आहे, याचा खुलासा अश्विननं केला आहे. अश्विननं यंदा तब्बल 4 वर्षांनी इंटरनॅशनल टी20 मॅच खेळली आहे.

अश्विननं त्याच्या यू ट्यूब चॅनलवर सांगितले की, 'चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) ही टीम त्याच्या सर्वात जवळची आहे. ती टीम अश्निनसाठी शाळेसारखी आहे. तिथं त्याने प्रीकेजी, एलकेजी, यूकेजी आणि प्राथमिक शाळेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर तो दुसऱ्या शाळेत गेला. सर्व गोष्टी मनासारख्या घडल्या तर मला माझ्या घरी परत येण्यास आवडेल. पण, हे सर्व ऑक्शनवर अवलंबून आहे.' जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएल मेगा ऑक्शन होण्याची शक्यता आहे.

अश्विन पुढे म्हणाला की, 'यंदाचे ऑक्शन साधे नसेल. 10 टीम वेगवेगळ्या रणनीतीसह उतरणार आहे. त्यांचा प्रत्येकाचा वेगळा विचार असेल. मी कोणत्या प्लेईंग 11 मध्ये फिट होईल हे माहिती नाही. एक व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून मी कोणत्याही टीमसाठी 100 टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करेल. ज्या टीमनं माझ्यासाठी पैसा खर्च केला आहे. माझ्यावर विश्वास दाखवलाय. त्यांना मी निराश करणार नाही.'

IPL 2022 : नव्या टीमचा कॅप्टन ठरला, टीम इंडियातील दिग्गजाला मिळणार जबाबदारी!

अश्विननं 2010 साली टीम इंडियात पदार्पण केले. तो आयपीएलच्या सुरुवातीपासून 2015 पर्यंत सीएसकेकडे होता. त्याने सीएसकेकडून 94 मॅचमध्ये 90 विकेट्स घेतल्या आहेत. चेन्नईच्या टीमवर बंदी आल्यानंतर दोन वर्ष तो रायझिंग पुणे सुपर जायंट्स (Rising Pune Supergiant) या टीमकडून खेळला. त्यानंतरची दोन सिझन पंजाबकडून खेळल्यानंतर आयपीएल 2020 पूर्वी त्याला दिल्लीने खरेदी केले. दिल्लीनं या सिझनमध्ये ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्किया आणि अक्षर पटेल यांना रिटेन केले आहे.

First published:

Tags: Csk, Ipl 2022, MS Dhoni, R ashwin