मुंबई, 26 नोव्हेंबर: आयपीएल स्पर्धेच्या मेगा ऑक्शनपूर्वी (IPL 2022 Mega Auction) खेळाडूंना रिटेन करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे. सध्या सर्व टीमची यादी अंतिम टप्प्यात आली आहे. त्याचवेळी मागच्या सिझनमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद (SRH) टीमपुढे नवी अडचण निर्माण झाली आहे. हैदराबाद टीमचे मालक आणि त्यांचा प्रमुख खेळाडू राशिद खान (Rashid Khan) यांच्या बोलणीत पेच निर्माण झाला आहे.
राशिद खाननं त्याच्या आयपीएल करिअरची सुरूवात याच टीमकडून केली आहे. हैदराबाद मॅनेजनेंटची राशिदला रिटेन करण्याची इच्छा आहे. पण त्यासाठी राशिदची एक इच्छा पूर्ण करण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे ही डील अडकली आहे, असं वृत्त 'क्रिकबझ' नं दिलं आहे.
या वृत्तानुसार, SRH नं नंबर 1 खेळाडू म्हणून आपल्याला रिटेन करावं अशी राशिदची इच्छा आहे. तर हैदराबादच्या मॅनेजमेंटनं न्यूझीलंड आणि SRH टीमचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) याला पहिल्या क्रमांकानं रिटेन करण्याचं ठरवलं आहे. नंबर 1 आणि नंबर 2 यांना मिळणाऱ्या रकमेत 4 कोटींचा फरक आहे. याच कारणामुळे अजून राशिदनं SRH चा निर्णय मान्य केलेला नाही. हैदराबादची दोन्ही खेळाडूंना रिटेन करण्याची तयारी आहे. पण, याबाबत तोडगा निघाला नाही तर SRH मॅनेजमेंट फक्त विल्यमसनला पंसती देऊ शकते असा दावा या बातमीत करण्यात आला आहे.
IPL 2022: राजस्थाननं दिग्गज खेळाडूला केलं रिटेन, बेन स्टोक्सला दिला धक्का!
'या' दिग्गजांना करणार बाहेर
SRH नं विल्यमसन आणि राशिद खान या दोनच खेळाडूंना रिटेन करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्यांच्या टीममधील डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय हे प्रमुख विदेशी खेळाडू पुन्हा एकदा लिलावात सहभागी होतील. तर भुवनेश्वर कुमार आणि नटराजन या भारतीय खेळाडूंनाही निराशा सहन करावी लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction, SRH