मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022: राजस्थाननं दिग्गज खेळाडूला केलं रिटेन, बेन स्टोक्सला दिला धक्का!

IPL 2022: राजस्थाननं दिग्गज खेळाडूला केलं रिटेन, बेन स्टोक्सला दिला धक्का!

आयपीएलच्या पुढील सिझनपूर्वी होणाऱ्या मेगा ऑक्शनचे (IPL 2022 Mega Auctuion) काऊंटडाऊन सुरु झाले आहे. राजस्थान रॉयल्स पुढील सिझनपूर्वी ऑल राऊंडर बेन स्टोक्सला (Ben Stokes) धक्का देण्याच्या तयारीत आहे.

मुंबई, 26 नोव्हेंबर:  आयपीएलच्या पुढील सिझनपूर्वी होणाऱ्या मेगा ऑक्शनचे (IPL 2022 Mega Auctuion) काऊंटडाऊन सुरु झाले आहे. आयपीएलमधील जुन्या टीमना रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी 30 नोव्हेंबरपर्यंत बीसीसीआयला सादर करायची आहे.  त्यामुळे सर्व फ्रँचायझींनी त्यांची यादी फायनल करण्यात सुरुवात केली आहे. राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) त्यांचा पहिला खेळाडू निश्चित केला आहे.

राजस्थाननं त्यांचा आयपीएल 2021 (IPL 2021) मधील कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) याला रिटेन केले आहे. संजूला प्रत्येक सिझनमध्ये 14 कोटींची रक्कम देण्यात येणार असल्याचं वृत्त 'इएसपीएन क्रिकइन्फो' नं दिली आहे. संजूला 2018 साली राजस्थाननं 8 कोटींमध्ये करारबद्ध केले होते. त्याला मागील सिझनपूर्वी कॅप्टन करण्यात आले. आयपीएल 2021 चा सिझन त्याच्यासाठी चांगलाच यशस्वी ठरला. त्यानं या सिझनमध्ये 137 च्या स्ट्राईक रेटनं 484 रन केले आहेत.

राजस्थान रॉयल्समधील अन्य तीन जांगासाठी जोस बटलर (Jos Buttler), जोफ्रा आर्चर (Jofra Archer) लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) आणि यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) या चार जणांशी बोलणी सुरू आहे. जोस बटलर, जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स हे इंग्लंडचे प्रमुख खेळाडू राजस्थानच्या टीमचे सदस्य आहेत.

IPL 2022: श्रेयस अय्यरला हट्ट पडला महाग, कॅप्टनसी नाहीच पण टीममधूनही बाहेर

जोफ्रा आर्चरनं आयपीएल 2020 मध्ये 'प्लेयर ऑफ द टुर्नामेंट' पुरस्कार जिंकला होता. तो दुखापतीमुळे मागील सिझन खेळू शकला नाही. टी20 वर्ल्ड कप गाजवणाऱ्या जोस बटलरला (Jos Buttler) राजस्थान रिटेन करण्याची दाट शक्यता आहे. पण ऑल राऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) बाबतचा चित्र अद्याप अस्पष्ट आहे. स्टोक्सनं मानसिक कारणांमुळे बराच काळ ब्रेक घेतला होता. तो नुकताच इंग्लंड टीममध्ये परतला आहे. स्टोक्सचा फिटनेस तसंच राजस्थान रॉयल्स त्याला किती रक्कम ऑफर करते यावर हे भविष्य ठरणार आहे.

First published:

Tags: Ben stokes, Ipl 2022 auction, Rajasthan Royals, Sanju samson