Home /News /sport /

IPL 2022 : 2 वर्ष संधी न देणाऱ्या टीमला शिकवला धडा! 'किलर'स्टाईलनं केली फायनलमध्ये एन्ट्री

IPL 2022 : 2 वर्ष संधी न देणाऱ्या टीमला शिकवला धडा! 'किलर'स्टाईलनं केली फायनलमध्ये एन्ट्री

फोटो - BCCI

फोटो - BCCI

या संपूर्ण सिझनमध्ये गुजरातनं (Gujarat Titans) सर्वांचा अंदाज खोटा ठरवणारा खेळ केलाय. गेली काही सिझन फारशी संधी न मिळालेल्या खेळाडूचा गुजरातच्या यशात मोठा वाटा आहे.

    मुंबई, 25 मे : आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच खेळत असलेल्या गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) फायनलमध्ये प्रवेश केला आहे. लीग स्टेजमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या या टीमनं पहिल्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) दिलेलं 189 रनचं आव्हान 7 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या संपूर्ण सिझनमध्ये गुजरातनं सर्वांचा अंदाज खोटा ठरवणारा खेळ केलाय. गेली काही सिझन फारशी संधी न मिळालेल्या खेळाडूचा गुजरातच्या यशात मोठा वाटा आहे. राजस्थान विरूद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी गुजरातला 16 रन आवश्यक होते. त्यावेळी डेव्हिड मिलरनं (David Miller) कोणतंही दडपण घेतलं नाही. त्यानं प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्या 3 बॉलवर 3 सिक्स लगावत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मिलरनं या मॅचमध्ये 38 बॉलमध्ये नाबाद 68 रन केले. त्याची ही खेळी एकदाम खास होती. या खेळीचा गुजरातला फायनलमध्ये नेण्यासाठी मोठा उपयोग झाला. त्याचबरोबर त्यानं गेली दोन सिझन फार संधी न दिलेल्या टीमलाही धडा शिकवला आहे. राजस्थाननं मिलरनं 2020 मध्ये खरेदी केले होते. पण, त्यांनी त्याला पूर्ण संधी दिलीच नाही. आयपीएल 2020 मध्ये मिलर 1 सामने खेळला. मागील वर्षी त्याला 9 सामने मिळाले. याचाच अर्थ मागील दोन सिझनमध्ये मिलर फक्त 10 सामने खेळला. मिलरलाही मागील दोन सिझनमध्ये फार यश मिळालं नाही. त्यानं या काळात फक्त 124 रन केले होते. त्यानंतर त्याला राजस्थाननं यंदा रिलीज केले होते. मिलरला यंदाच्या आयपीएल ऑक्शमधील पहिल्या राऊंडमध्ये कोणत्याही टीमनं खरेदी केले नव्हते. गुजरातनं दुसऱ्या राऊंडमध्ये त्याला 3 कोटींमध्ये खरेदी केले. या सिझनमध्ये त्यानं टीमला दमदार रिटर्न्स दिले आहेत. त्यानं आत्तापर्यंत 15 सामन्यात 64 ची सरासरी आणि 141 च्या स्ट्राईक रेटनं 449 रन केले आहेत. आयपीएल स्पर्धेतील त्याची ही आजवरची चांगली कामगिरी आहे. त्यानं यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स विरूद्धच्या सामन्यातही टीमला अडचणीतून बाहेर काढून विजय मिळवला दिला होता. IPL 2022 : Mumbai Indians ने एकदाही दिली नाही Arjun Tendulkar ला संधी, सचिनने सोडलं मौन आयपीएल 2022 मध्ये  बुधवारी आरसीबी आणि लखनऊ यांच्यात एलिमिनेटरचा सामना होणार आहे. या सामन्यात विजयी होणारी टीम राजस्थानविरुद्ध क्वालिफायरचा दुसरा सामना खेळेल. क्वालिफायरच्या या दुसऱ्या सामन्यात जिंकणारी टीम फायनलमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध मैदानात उतरेल. 29 मे रोजी आयपीएलची फायनल होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Gujarat Titans, Ipl 2022, Rajasthan Royals

    पुढील बातम्या