मुंबई, 11 मे : मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) यंदाचा आयपीएल सिझन निराशाजनक ठरला आहे. पाच वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या या टीमनं आत्तापर्यंत 11 पैकी 9 सामने गमावले आहेत. आयपीएल ‘प्ले ऑफ’ च्या शर्यतीमधून बाहेर पडलेली मुंबई ही पहिली टीम आहे. मैदानावरील खराब कामगिरीनंतरही टीममधील पॉझिटिव्ह वातावरण कायम आहे. मुंबईचे खेळाडू रिकामा वेळ एकमेकांच्या सहवासात आनंदानं घालवत आहेत. मुंबई इंडियन्सचा ऑल राऊंडर अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) अद्याप आयपीएल पदार्पणाची प्रतीक्षा आहे. मुंबईच्या नेटमध्ये अर्जुन जोरदार बॉलिंग करत असतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता अर्जुनचं आणखी एक कौशल्य जगासमोर आलं आहे. त्यामध्ये अर्जुन टीममधील सहकाऱ्यांसाठी स्वयंपाक करताना दिसत आहे. अर्जुनचा हा फोटो मुंबई इंडियन्समधील नवोदीत सदस्य धवल कुलकर्णीनं शेअर केला आहे. मुंबई इंडियन्सची पुढील मॅच आता चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरूद्ध होणार आहे. या मॅचमध्ये तरी अर्जुनला संधी मिळणार का? याची सर्व फॅन्सना उत्सुकता आहे. मागच्या हंगामापासून अर्जुन मुंबईसोबत आहे, पण त्याला अजूनही पदार्पणाची संधी मिळालेली नाही. यावेळी मुंबईने अर्जुनला 30 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं.
IPL 2022 नंतर दक्षिण आफ्रिका सीरिजमधूनही टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू आऊट
मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने (Mahela Jayavardene) यांना काही दिवसांपूर्वी अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. ‘प्रत्येक खेळाडू टीमसाठी पर्याय आहे, गोष्टी कशा पुढे जातात ते आम्ही बघू,’ असं उत्तर जयवर्धने यांनी दिलं. मुंबईची टीम नव्या आणि प्रतिभावान खेळाडूंवर विश्वास दाखवण्यासाठी ओळखली जाते. यावेळी फ्रॅन्चायजीने दक्षिण आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रेविस आणि तिलक वर्मा यांना संधी दिली, या दोन्ही खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी चांगली कामगिरी केली. त्याचप्रमाणे आता अर्जुनलाही संधी द्यावी अशी मागणी क्रिकेट फॅन्स करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.