मुंबई, 28 फेब्रुवारी : टीम इंडिया विरूद्धच्या तिसऱ्या टी20 मालिकेत श्रीलंकेला व्हाईट वॉश मिळाला. टीम इंडियानं ही मालिका (India vs Sri Lanka T20 Series) 3-0 अशा फरकानं जिंकली. या सीरिजमध्ये श्रीलंकेच्या एका खेळाडूनं शेवटच्या दोन मॅचमध्ये जबरदस्त खेळ केला. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये एकाही टीमनं त्याला खरेदी करण्यात उत्सुकता दाखवली नव्हती. त्याची या सीरिजमधील बॅटींग पाहून सर्वच टीमना पश्चाताप होत असेल. रविवारी झालेल्या तिसऱ्या टी20 मॅध्ये श्रीलंकेचा कॅप्टन दासून शनाकानं (Dasun Shanaka) 38 बॉलमध्ये नाबाद 74 रन केले. त्यानं या खेळीत 9 फोर आणि 2 सिक्स लगावले. शनाकाचा यावेळी स्ट्राईक रेट 194.73 इतका होता. श्रीलंकेची अवस्था 4 आऊट 29 अशी होती, त्यावेळी शनाका बॅटींगला आला होता. त्याने या अवघड परिस्थितीमध्ये बॅटींग करत श्रीलंकेला 140 चा टप्पा ओलांडून दिला.
Dasun Shanaka's brilliant knock of 74* helps Sri Lanka to a total of 146/5 👏
— ICC (@ICC) February 27, 2022
Can the visitors defend this? #INDvSL | 📝 https://t.co/x2kKwnfVnk pic.twitter.com/CKNE57Dy7Z
दासून शनाका आणि चमिका करूणारत्ने या जोडीनं सहाव्या विकेटसाठी 47 बॉलमध्ये नाबाद 86 रनची भागिगारी केली. यामध्ये शनाकानं 28 बॉलमध्ये 63 रनचे योगदान दिले. तर करूणारत्नेनं 19 बॉलमध्ये 12 रन केले. शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये त्यांनी 68 रन केले. IND vs SL : रोहितनं सीरिज जिंकल्यानंतर ज्याच्या हातात ट्रॉफी दिली ती व्यक्ती कोण आहे? VIDEO शनाकानं शनिवारी झालेल्या मॅचमध्येही 19 बॉलमध्ये नाबाद 47 रन केले होते. त्या खेळीत त्याने 2 फोर आणि 5 सिक्स लगावले होते. शनाकानं 247.36 च्या स्ट्राईक रेटनं केलेल्या खेळीमुळे श्रीलंकेला दुसऱ्या टी20 मध्ये 5 आऊट 183 रन करता आले होते. श्रीलंकेनं शनिवारी झालेल्या मॅचमध्ये शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये 80 रन केले होते. त्यामध्ये शनाकाच्या आक्रमक बॅटींगचे योगदान होते. त्याने रविवारीही या खेळीची पुनरावृत्ती केली. त्याची ही आक्रमक बॅटींग आयपीएल टीमच्या नजरेत नक्कीच भरली असेल. आता आगामी स्पर्धेच्या दरम्यान कुणी माघार घेतली अथवा कोणता खेळाडू जखमी झाल्यास बदली खेळाडू म्हणून शनाकाचा विचार होऊ शकतो.