मुंबई, 12 मे : वेस्ट इंडिजचा माजी कॅप्टन कायरन पोलार्ड (Kieron Pollard Birthday) आज 35 वाढदिवस साजरा करत आहे. पोलार्डनं काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो सध्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सदस्य आहे. पोलार्डसाठी हा आयपीएल सिझन निराशाजनक ठरला आहे. तो मुंबईच्या अपयशी खेळाडूंपैकी एक आहे. बॅट आणि बॉल दोन्ही पातळीवर संघर्ष केला आहे. पोलार्डच्या खराब फॉर्मनंतरही चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरूद्ध आज होणाऱ्या मॅचमध्ये मुंबईचा विजय नक्की मानला जातोय. यामागील कारणही खास आहे.
पोलार्डनं या आयपीएल सिझनमध्ये 11 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं फक्त 144 रन केले आहेत. त्याला एकही अर्धशतक झळकवता आलेलं नाही. 25 हा त्याचा सर्वोच्च खेळ आहे. पोलार्डच्या खराब फॉर्मचा परिणाम मुंबई इंडियन्सवरही झालाय. मुंबईची टीम आयपीएलमधून आऊट झाली आहे. या सर्व इतिहासानंतरही 12 मे हा दिवस पोलार्ड आणि मुंबईसाठी खास आहे. पोलार्डच्या वाढदिवशी मुंबई इंडियन्स आजवर एकदाही पराभूत झालेली नाही.
कायरन पोलार्ड 2010 पासून मुंबई इंडियन्सचा सदस्य आहे. पोलार्डचा टीममध्ये समावेश झाल्यानंतर मुंबईनं आजवर 12 मे रोजी तीन सामने खेळले आहेत. त्या तीन्ही सामन्यांमध्ये मुंबईचा विजय झाला आहे. आज चौथ्यांदा मुंबईची टीम या दिवशी मैदानात उतरणार आहे.
12 मे 2012 रोजी मुंबई इंडियन्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा 27 रननं पराभव केला होता. त्या मॅचमध्ये पोलार्डला बॅटींग करण्याची संधी मिळाली नाही. 12 मे 2014 रोजी मुंबईनं दुसऱ्यांदा पोलार्डच्या वाढदिवशी आयपीएलचा सामना खेळला. या सामन्यात मुंबईनं सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सनं पराभव केला. त्या मॅचमध्ये पोलार्डनं 7 बॉलमध्ये 6 रन केले होते.
IPL 2022 : दिल्लीचं आव्हान कायम, राजस्थानसह 4 टीमचं वाढलं टेन्शन!
आयपीएल विजेतेपद
12 मे 2019 रोजी पोलार्डचा वाढदिवस हा मुंबई इंडियन्ससाठी सर्वात खास ठरला. त्या दिवशी झालेल्या आयपीएल फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं शेवटच्या बॉलवर चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला होता. लसिथ मलिंगानं शार्दुल ठाकूरला आऊट करत मुंबईच्या चौथ्या आयपीएल विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Csk, Ipl 2022, Kieron pollard, Mumbai Indians