मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : पराभवानंतरही धोनीनं केली टीमची प्रशंसा, पुढील सिझनसाठी दिला इतरांना इशारा

IPL 2022 : पराभवानंतरही धोनीनं केली टीमची प्रशंसा, पुढील सिझनसाठी दिला इतरांना इशारा

सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) पराभवानंतरही बॉलर्सची प्रशंसा केली असून अन्य टीमना गंभीर इशारा दिला आहे.

सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) पराभवानंतरही बॉलर्सची प्रशंसा केली असून अन्य टीमना गंभीर इशारा दिला आहे.

सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) पराभवानंतरही बॉलर्सची प्रशंसा केली असून अन्य टीमना गंभीर इशारा दिला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 13 मे : चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) ही आयपीएल 2022 (IPL 2022) मधून बाहेर पडलेली दुसरी टीम बनली आहे. गुरूवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं चेन्नईचा 5 विकेट्सनं पराभव केला. या पराभवासह चेन्नईच्या उरलेल्या सर्व आशा संपुष्टात आल्या. या पराभवानंतरही सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) बॉलर्सची प्रशंसा केली असून अन्य टीमना गंभीर इशारा दिला आहे.

मॅच संपल्यानंतर धोनी म्हणाला की, 'कोणत्याही पिचवर 130 पेक्षा कमी रन वाचवणे हे अवघड असते. मी बॉलर्सना परिणामाचा विचार न करता सर्वोत्तम खेळ करण्याचा सल्ला दिला होता. दोन्ही तरूण फास्ट बॉलर्सनी चांगला खेळ केला. या प्रकारच्या खेळातूनच त्यांचा स्वत:वरील विश्वास वाढेल. मॅचमध्ये परिस्थिती काहीही असली तरी क्रिकेटमधील सर्वात छोट्या फॉर्मेटला आवश्यक अशा मनस्थितीमधूनच खेळ केला पाहिजे.

आमच्याकडे यापूर्वी फास्ट बॉलर्सची बेंच स्ट्रेंथ कधीही नव्हती. तसंच फास्ट बॉलर्स परिपक्व होण्यास वेळ लागतो. तुम्ही नशिबवान असाल तरच सहा महिन्यामध्ये सर्व फॉर्मेट खेळेल असा बॉलर मिळतो. ते आता धाडसी बॉलिंग करत आहेत जे या प्रकारात आवश्यक आहे. आमच्याकडे दोन चांगले फास्ट बॉलर असणे ही सकारात्मक बाब आहे. त्याचबरोबर आमच्याकडे आणखी काही बॉलर आहेत. त्यांना तयार होण्यासाठी काही वेळ दिला पाहिजे.' असे धोनीनं सांगितलं.

IPL 2022 : CSK चा तरूण खेळाडू बनला 'पॉवर प्ले' किंग, मोहम्मद शमीलाही टाकलं मागं

मुंबई इंडियन्स विरूद्धच्या मॅचमध्ये मुकेश चौधरी आणि सिमरजीत सिंग यांनी दमदार बॉलिंग केली. त्यांनी 'पॉवर प्ले' मध्ये 4 विकेट्स घेत मुंबईला बॅकफुटवर ढकललं होतं. मुकेश चौधरीनं या आयपीएल सिझनमधील 'पॉवर प्ले' मध्ये सर्वाधिक 11 विकेट्स घेतल्या आहेत. पहिलाच आयपीएल सिझन खेळणाऱ्या मुकेशनं टीम इंडिया आणि गुजरात टायटन्सचा अनुभवी बॉलर मोहम्मद शमीलाही मागं टाकलं आहे. शमीनं 10 विकेट्स घेतल्या आहेत. तर कागिसो रबाडा आणि उमेश यादव यांच्या नावावर 'पॉवर प्ले' मध्ये प्रत्येकी 8 विकेट्स आहेत.

First published:

Tags: Csk, Ipl 2022, MS Dhoni, Mumbai Indians