मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : दिल्लीचं आव्हान कायम, राजस्थानसह 4 टीमचं वाढलं टेन्शन!

IPL 2022 : दिल्लीचं आव्हान कायम, राजस्थानसह 4 टीमचं वाढलं टेन्शन!

Photo: iplt20.com

Photo: iplt20.com

दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) मोठा पराभव करत आयपीएल 2022 मधील 'प्ले ऑफ' ची शर्यत आणखी चुरशीची केली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 12 मे : दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) मोठा पराभव करत आयपीएल 2022 मधील 'प्ले ऑफ' ची शर्यत आणखी चुरशीची केली आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये राजस्थाननं पहिल्यांदा बॅटींग करत 6 आऊट 160 रन केले होते. दिल्लीनं हे आव्हान 11 बॉल आणि 8 विकेट्स राखून पूर्ण केले. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी अर्धशतक झळकावले.

पॉईंट टेबलमध्ये चुरस

चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध झालेल्या मोठ्या पराभवानंतर दिल्लीचं स्पर्धेतील आव्हान धोक्यात आले होते. ऋषभ पंतच्या या टीमनं या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा सहज पराभव केला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे या विजयानंतर 12 पॉईंट्स झाले आहेत. दिल्लीचा या विजयानंतरही पॉईंट टेबलमध्ये पाचवा क्रमांक कायम आहे, पण राजस्थान आणि आरसीबी यांच्यातील त्यांचं अंतर कमी झालं आहे. या दोन्ही टीमचे प्रत्येकी 14 पॉईंट्स आहेत.

विशेष म्हणजे दिल्ली, राजस्थान आणि आरसीबी यांचे प्रत्येकी 12 सामने झाले आहेत. त्यामुळे राजस्थान आणि आरसीबीला उर्वरित दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे भाग आहे. अन्यथा दिल्लीनं पुढील दोन्ही सामने जिंकले तर चांगल्या रनरेटच्या आधारे दिल्ली 'प्ले ऑफ' मध्ये दाखल होईल आणि या दोन्हीपैकी एका टीमचं आव्हान संपुष्टात येऊ शकते.

सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज या टीमचंही दिल्लीच्या विजयानं टेन्शन वाढलं आहे. या दोन्ही टीमचे 11 सामने झाले असून प्रत्येकी 10 पॉईंट्स आहेत. त्यांना उरलेले तीन्ही सामने चांगल्या रनरेटनं जिंकणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्यांना 'प्ले ऑफ' मध्ये जाण्याची आशा बाळगता येईल. उर्वरित सामन्यांमधील एकही चूक त्यांना महागात पडू शकते.

IPL 2022 : दिल्लीला मिळाली नशिबाची साथ, एकाच ओव्हरमध्ये दोनदा वाचला वॉर्नर

कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचं स्पर्धेतील आव्हान कायम आहे. पण, त्यासाठी त्यांना उर्वरित सामने मोठ्या फरकानं जिंकण्याबरोबरच अन्य निकालांवरही अवलंबून राहावं लागणार आहे. तर मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आलं आहे.

First published:

Tags: Delhi capitals, Ipl 2022, Rajasthan Royals