मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : दिल्लीला मिळाली नशिबाची साथ, एकाच ओव्हरमध्ये दोनदा वाचला वॉर्नर

IPL 2022 : दिल्लीला मिळाली नशिबाची साथ, एकाच ओव्हरमध्ये दोनदा वाचला वॉर्नर

Photo: iplt20.com

Photo: iplt20.com

डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि मिचेल मार्श (Mitchell Marsh) या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी 144 रनची भागिदारी केल्यानं दिल्लीनं हा विजय मिळवला. दिल्लीच्या विजयात नशिबाचाही वाटा होता.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 12 मे : दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्सचा (Delhi Capitals vs Rajasthan Royals) 8 विकेट्नं पराभव करत 'प्ले ऑफ' च्या शर्यतीमधील आव्हान कायम ठेवलं आहे. डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि मिचेल मार्श (Mitchell Marsh) या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी 144 रनची भागिदारी केल्यानं दिल्लीनं हा विजय मिळवला. दिल्लीच्या विजयात नशिबाचाही वाटा होता. वॉर्नर आणि मार्श ही जोडी लकी ठरली. वॉर्नरला तर एकाच ओव्हरमध्ये दोन वेळा नशिबाची साथ मिळाली.

दिल्लीच्या इनिंगमधील 9 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. राजस्थानकडून युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ही ओव्हर टाकत होता. या ओव्हरचा तिसरा बॉल वॉर्नरनं हवेत खेळला. जोस बटलरनं लाँग ऑफ वरून पळत येत कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यावेळी दिल्लीचा स्कोर 63 होता आणि वॉर्नर 19 रन काढून खेळत होता. चहलच्या त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर जे झालं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

चहलचा तो बॉल खेळण्याचा वॉर्नरचा प्रयत्न फसला. बॉल सरळ स्टम्पला लागला. स्टम्पचा लाल लाईटही लागला पण बेल्स उडाल्या नाहीत. त्यामुळे वॉर्नरला आणखी एक मोठं जीवदान मिळालं. या दोन जीवदानाचा फायदा घेत वॉर्नरनं नाबाद 52 रन केले. त्यानं या सिझनमधील पाचवं अर्धशतक झळकावलं. त्याचबरोबर 400 रनही पूर्ण केले.

IPL 2022 : मार्श-वॉर्नरने राजस्थानला धुतलं, दिल्लीचं प्ले-ऑफचं आव्हान अजूनही कायम

मार्शबाबत चूक

डेव्हिड वॉर्नरला नशिबाची साथ मिळाली, तर त्याचा पार्टनर मिचेल मार्शला राजस्थानच्या चुकीचा फायदा झाला. दिल्लीचा स्कोअर 2 रन असताना मिचेल मार्शही पॅव्हेलियनमध्ये गेला असता, पण राजस्थानने मोठी चूक केली. तिसऱ्या ओव्हरचा तिसरा बॉल ट्रेन्ट बोल्टने यॉर्कर टाकला. हा बॉल मार्शच्या बुटांना जाऊन लागला. यानंतर बोल्टने थोडं अपील केलं, पण त्याला राजस्थानच्या खेळाडूंनी साथ दिली नाही, त्यामुळे राजस्थानने डीआरएसही घेतला नाही.

बोल्टने टाकलेला यॉर्कर बॉल पहिले मार्शच्या बॅटला लागून मग बुटांना लागला, असं राजस्थानच्या टीमला वाटत होतं, पण रिप्लेमध्ये मात्र बॉल पहिले बुटांना आणि मग बॅटला लागल्याचं दिसत होतं. तसंच बॉल स्टम्पवर जाऊन आदळत असल्याचंही रिप्लेमध्ये स्पष्ट झालं, त्यामुळे राजस्थानने जर डीआरएस घेतला असता, तर मार्श एलबीडब्ल्यू झाला असता. ही घटना घडली तेव्हा मार्श 8 बॉलमध्ये 1 रनवर खेळत होता. त्यानंतर मार्शनं आणखी 88 रन करत राजस्थानचा पराभव निश्चित केला.

First published:

Tags: David warner, Delhi capitals, Ipl 2022, Rajasthan Royals, Yuzvendra Chahal