जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 Points Table : मुंबईचा पराभव करत पंजाबची मोठी उडी, टॉप 4 मधील स्पर्धा तीव्र

IPL 2022 Points Table : मुंबईचा पराभव करत पंजाबची मोठी उडी, टॉप 4 मधील स्पर्धा तीव्र

IPL 2022 Points Table : मुंबईचा पराभव करत पंजाबची मोठी उडी, टॉप 4 मधील स्पर्धा तीव्र

पंजाब किंग्जनं मुंबई इंडियन्सचा (PBKS vs MI) पराभव करत पॉईंट टेबलमध्ये मोठी उडी मारली आहे. तर मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) शेवटचा क्रमांक कायम आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 एप्रिल : मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) आयपीएल 2022 मधील आणखी एक मॅच गमावली आहे. पुण्यात बुधवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबईचा पंजाब किंग्जनं (MI vs PBKS) 12 रननं पराभव केला.  मुंबईचा हा या सिझनमधील सलग पाचवा पराभव असून पहिला विजय मिळवण्याची त्यांची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. या पराभवानंतर मुंबईचा शेवटचा क्रमांक कायम आहे. पंजाब किंग्जचा हा या स्पर्धेतील तिसरा विजय असून त्यांनी पॉईंट टेबलमध्ये मोठी उडी मारली आहे. पंजाबची टीम या मॅचपूर्वी 2 विजयासह सातव्या क्रमांकावर होती. आता त्यांनी थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. आयपीएल पॉईंट टेबलमध्ये एक ते सहा क्रमांकापर्यंतच्या सर्व टीमचे समान 6 पॉईंट्स आहेत. त्यामुळे रनरेटच्या आधारावर त्यांचे क्रमांक ठरले आहेत. राजस्थान रॉयल्स पहिल्या तर कोलकाता नाईट रायडर्सची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पंजाबचा नंबर आहे. लखनऊ सुपर जायंट्सनं चौथ्या क्रमांकासह टॉप 4 मधील जागा कायम राखली आहे. हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स पाचव्या तर सीएसके विरूद्ध पराभूत झालेली रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची टीम सहाव्या क्रमांकावर आहे. ऋषभ पंतची दिल्ली कॅपिटल्स सातव्या क्रमांकावर असली तरी त्यांनी टॉप 6 मधील टीमपेक्षा एक मॅच कमी खेळली आहे. सनरायझर्स हैदराबादानंही दिल्लीप्रमाणेच 4 मॅचनंतर 4 पॉईंट्सची कमाई केली. पण, दिल्लीपेक्षा कमी रन रेट असल्यानं ती टीम आठव्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्सची पाच मॅचमध्ये एक विजयासह नवव्या तर सर्व पाच मॅच गमावल्यानंतर मुंबई इंडियन्स शेवटच्या दहाव्या क्रमांकावर आहे. IPL 2022 : मुंबई इंडियन्सनं संधी न दिलेल्या खेळाडूनं केला टीमचा पराभव, महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन धवन तिसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्जचा ओपनर शिखर धवननं (Shikhar Dhawan) ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्ये दमदार एन्ट्री घेतली आहे. धवननं मुंबई विरूद्ध 50 बॉलमध्ये 70 रन केले. त्यामुळे तो सर्वात जास्त रन करणाऱ्या बॅटर्सच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. धवनचे पाच मॅचनंतर 197 रन आहेत. या यादीमध्ये राजस्थानचा जोस बटलर 218 रनसह पहिल्या क्रमांकावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात