मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : मुंबई इंडियन्सनं संधी न दिलेल्या खेळाडूनं केला टीमचा पराभव, महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

IPL 2022 : मुंबई इंडियन्सनं संधी न दिलेल्या खेळाडूनं केला टीमचा पराभव, महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

फोटो - BCCI

फोटो - BCCI

पंजाब किंग्जनं (Punjab Kings) आयपीएल 2022 मधील तिसरा विजय मिळवला आहे. बुधवारी पुण्यात झालेल्या मॅचमध्ये त्यांनी मुंबई इंडियन्सचा 12 रननं पराभव केला.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 14 एप्रिल : पंजाब किंग्जनं (Punjab Kings) आयपीएल 2022 मधील तिसरा विजय मिळवला आहे. बुधवारी पुण्यात झालेल्या मॅचमध्ये त्यांनी मुंबई इंडियन्सचा 12 रननं पराभव केला. पंजाबनं दिलेलं 199 रनचं आव्हान मुंबईला पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 आऊट 186 रनच करू शकली. पंजाबकडून कॅप्टन मयंक अग्रवाल आणि शिखर धवन या अनुभवी खेळाडूंनी अर्धशतक केलं. तर विकेट किपर जितेश शर्मानं (Jitesh Sharma) 15 बॉलमध्ये नाबाद 30 रनची आक्रमक खेळी केली.

जितेशची इनिंग निर्णायक

पंजाबचा अनुभवी ओपनर शिखर धवन 17 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर आऊट झाला. त्यावेळी टीमचा स्कोर 151 होता. धवन आऊट झाल्यानंतर पंजाबची इनिंग 180 च्या आत रोखण्याची संधी मुंबईला होती. पण, जितेशनं त्यांच्या प्लान यशस्वी होऊ दिला नाही. त्यानं जयदेव उनाडकतच्या 18 व्या ओव्हरमध्ये 2 सिक्स आणि 2 फोर लगावले.

उनाडकतच्या या ओव्हरमध्ये एकूण 23 रन निघाले. त्यामध्ये जितेशचा वाटा 20 रनचा होता. त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये केलेली ही फटकेबाजीच पंजाबच्या विजयात निर्णायक ठरली. पंजाबनं हा सामना अखेर 12 रननं जिंकला. मुंबई इंडियन्सच्या पराभवासाठी निर्णायक ठरलेला जितेश हा मुंबई इंडियन्सचा माजी सदस्य आहे. त्याला 2016 साली मुंबईनं करारबद्ध केले होते. तो 2018 पर्यंत मुंबईचा सदस्य होता. पण या तीन सिझनच्या कालावधीत त्याला एकही मॅच खेळायला मिळाली नाही. तीन सिझन बेंचवर बसवून ठेवलेल्या जितेशनंच मुंबईच्या पराभवात निर्णायक वाटा उचलला.

IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा बॅड पॅच सुरूच, पाचव्या पराभवानंतर रोहितवर बंदीची टांगती तलवार

महाराष्ट्राशी कनेक्शन

जितेशचे वडील मूळचे हिमाचल प्रदेशातल्या (Himachal Pradesh) कांगडा जिल्ह्यातले आणि आई अमरावतीतली. जितेश आणि नितेश या दोन्ही भावांचा जन्म अमरावतीमध्येच झाला आहे.  जितेशच्या क्रिकेट करिअरची सुरुवात अमरावतीतल्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्लबपासून झाली. तिथे त्याने प्रा. डॉ. दीनानाथ नवासे यांच्याकडून क्रिकेटचं प्रशिक्षण घेतलं. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ टीमचा सदस्य आहे.

जितेशला या आयपीएल ऑक्शनमध्ये पंजाब किंग्जनं 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं. त्यानं आयपीएल पदार्पणात धोनीचा अवघड कॅच घेण्याची हुशारी दाखवली होती. आता त्यापाठोपाठ मुंबई इंडियन्स विरूद्धही पंजाबच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Punjab kings