Home /News /sport /

IPL 2022 : उमरान मलिकच्या खतरनाक बाऊन्सरपुढे मयंक निरूत्तर, पाहा VIDEO

IPL 2022 : उमरान मलिकच्या खतरनाक बाऊन्सरपुढे मयंक निरूत्तर, पाहा VIDEO

पंजाबनं आयपीएल 2022 चा शेवट विजयानं केला. पण, त्यांचा कॅप्टन मयंक अग्रवालसाठी (Mayank Agarwal) शेवटची मॅच निराशाजनक ठरली.

    मुंबई, 23 मे : आयपीएल 2022 मधील लीग स्टेजचे सामने समाप्त झाले आहेत. रविवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जनं सनरायझर्स हैदराबादचा (PBKS vs SRH) 5 विकेट्सनं पराभव केला. हैदराबादनं दिलेलं 158 रनचं लक्ष्य पंजाबनं 15.1 ओव्हर्समध्येच पूर्ण केलं. पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोननं नाबाद 49 रन केले. पंजाबनं आयपीएल 2022 चा शेवट विजयानं केला. पण, त्यांचा कॅप्टन मयंक अग्रवालसाठी (Mayank Agarwal) शेवटची मॅच निराशाजनक ठरली. हैदराबादचा फास्ट बॉलर उमरान मलिकचा (Umran Malik) बाऊन्सर मयंकला लागला. त्यानं त्यानंतर कसाबसा एक रन पूर्ण केला, पण नंतर तो जमिनीवर आडवा झाला. त्यानंतर फक्त 4 बॉलमध्ये 1 रन काढून मयंक आऊट झाला.  मयंक 7 व्या ओव्हरमध्ये शाहरूख खान आऊट झाल्यानंतर बॅटींगसाठी आला होता. उमराननं शॉर्ट बॉलनं त्याचं स्वागत केलं. उमरानचा वेग मयंकला समजला नाही. त्याच्या बरगड्यावर बॉल लागला. मयंक जमिनिवर आडवा झालेला पाहून पंजाबच्या फिजियोनं मैदानात धाव घेतली. त्यांनी त्याच्यावर उपचार केले. या बॉलचा परिणाम त्याच्या खेळावर झाला. तो पुढच्याच ओव्हरमध्ये मोठा फटका मारण्याच्या नादात आऊट झाला. मयंक आऊट झाल्याचा परिणाम लिव्हिंगस्टोनवर झाला नाही. त्याने  22 बॉलमध्ये नाबाद 49 रन केले, यात 5 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. याशिवाय शिखर धवनने (Shikhar Dhawan) 39 आणि बेयरस्टोने 23 रनची खेळी केली. हैदराबादकडून फजलहक फारुकीला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, याशिवाय वॉशिंग्टन सुंदर, जगदीशा सुचित आणि उमरान मलिक यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. IND vs ENG: पुजारा पुन्हा आला पण रहाणे बाहेरच! टीम इंडियाच्या दिग्गजाला कधी मिळणार संधी? हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 43 रन केले, याशिवाय रोमारियो शेफर्डने नाबाद 26 आणि वॉशिंग्टन सुंदरने 25 रन केले. पंजाबकडून हरप्रीत ब्रार आणि नॅथन एलिस यांना 3-3 विकेट मिळाल्या, तर रबाडाला 1 विकेट घेण्यात यश आलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ipl 2022, Punjab kings, SRH

    पुढील बातम्या