जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : 'आऊट ऑफ फॉर्म' विराट कोहलीनं घेतली 'या' दिग्गजाची मदत, लवकरच दिसणार फरक

IPL 2022 : 'आऊट ऑफ फॉर्म' विराट कोहलीनं घेतली 'या' दिग्गजाची मदत, लवकरच दिसणार फरक

IPL 2022 : 'आऊट ऑफ फॉर्म' विराट कोहलीनं घेतली 'या' दिग्गजाची मदत, लवकरच दिसणार फरक

टीम इंडिया आणि आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) फॉर्म सध्या हरवलाय. या आयपीएल सिझनमध्ये विराट सलग दोन मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर (Golden Duck) आऊट झालाय.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 एप्रिल : टीम इंडिया आणि आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) फॉर्म सध्या हरवलाय. या आयपीएल सिझनमध्ये विराट सलग दोन मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर (Golden Duck) आऊट झालाय. सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध शनिवारी झालेल्या मॅचमध्ये (RCB vs SRH) मार्को जेनसनने विराटला पहिल्याच बॉलला आऊट केलं, याआधी लखनऊविरुद्ध दुष्मंता चमिरानेही पहिल्याच बॉलला विराटला माघारी पाठवलं. सततच्या अपयशानं विराटचे फॅन्स नाराज आहेत. माजी क्रिकेटपटूंनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिलाय. आरसीबीच्या कोचनीही विराट फॉर्ममध्ये नसल्याचं मान्य केलंय. या सर्व गदारोळात विराट कोहलीनं सनरायझर्स हैदराबाद विरूद्धची मॅच झाल्यानंतर महान क्रिकेटपटू ब्रायन लाराची (Brian Lara) भेट घेतली. लारा सनरायझर्सचा बॅटींग सल्लागार आहे. या दोघांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आरसीबीनंही त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हा फोटो शेअर केलाय.

जाहिरात

आयपीएल 2022 च्या 8 मॅचमध्ये विराटने फक्त 119 रन केले आहेत. आरसीबीने विराटला रिटेन करण्यासाठी 15 कोटी रुपये मोजले. मागच्या काही वर्षांपासून विराट कोहली संघर्ष करत आहे. 2019 साली नोव्हेंबर महिन्यात विराटने शेवटचं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं होतं. बांगलादेशविरुद्ध केलेल्या या खेळीनंतर विराटला एकही शतक करता आलेलं नाही. आयपीएल 2022 पूर्वी इंग्लंडमध्ये 2021 साली झालेल्या सीरिजमध्ये विराट पहिल्याच बॉलवर आऊट झाला होता. MI vs LSG : मुंबई इंडियन्स सचिनला वाढदिवसाचं गिफ्ट देणार का? रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी शनिवारचा सामना निराशाजनक ठरला. त्यांची संपूर्ण टीम फक्त 68 रनवर ऑल आऊट झाली. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादनं फक्त 48 बॉलमध्ये हा सामना जिंकला. आरसीबीची पुढील लढत राजस्थान रॉयल्स विरूद्ध मंगळवारी आहे. ब्रायन लारानं दिलेल्या टिप्सचा विराटला काही फायदा होणार का हे मंगळवारी स्पष्ट होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात