मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीवर फॅन्स संतप्त, विदेशी खेळाडूला केली शिवीगाळ

IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीवर फॅन्स संतप्त, विदेशी खेळाडूला केली शिवीगाळ

मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) आयपीएल 2022 मधील सुरूवात निराशाजनक झाली आहे.  मुंबईच्या या निराशाजनक कामगिरीनंतर काही फॅन्स संतप्त झाले असून त्यांचा राग टीममधील विदेशी खेळाडूवर निघाला आहे.

मुंबई, 9 एप्रिल : मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) आयपीएल 2022 मधील सुरूवात निराशाजनक झाली आहे. पाच वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबईनं पहिल्या तीन मॅचमध्ये पराभव सहन केला आहे. या पराभवानंतर मुंबई इंडियन्स पॉईंट टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. मुंबईच्या या निराशाजनक कामगिरीनंतर काही फॅन्स संतप्त झाले असून त्यांचा राग टीममधील विदेशी खेळाडूवर निघाला आहे.

केकेआर विरूद्ध मुंबई इंडियन्सच्या पराभवाला डॅनियल सॅम्सची (Daniel Sams) खराब कामगिरी जबाबदार ठरली. केकेआरविरुद्ध सॅम्सने एकाच ओव्हरमध्ये 35 रन दिले, ज्यामुळे 16 ओव्हरमध्येच त्यांचा विजय झाला. पॅट कमिन्सनं सॅम्सच्या एकाच ओव्हरमध्ये 35 रन काढले. या पराभवानंतर संतप्त झालेल्या फॅन्सनी सॅम्सच्या इन्स्टाग्राम पोस्टवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला आहे.

पॅट कमिन्सनं या मॅचनंतर बोलताना फटकेबाजीबद्दल आश्चर्य व्यक्त केलं होतं.' मला स्वत:लाही धक्का बसला आहे. मी फार विचार करत नव्हतो. ही खरंच समाधानकाक बाब होती. बॉल हवेत तरंगतो. असंच वाटत होतं. मी लहान बाऊंड्रीच्या दिशेनं शॉट लगावण्याचा प्रयत्न करत होतो,' असं कमिन्सनं सांगितलं.

IPL 2022 : तेवातियाला सर्व माहिती होतं! शेवटच्या 2 सिक्सचं रहस्य झालं उघड

मुंबई इंडियन्स करणार बदल

मुंबईचा पुढचा सामना शनिवारी आरसीबीविरुद्ध (MI vs RCB) पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर होणार आहे. या मॅचसाठी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा टीममध्ये बदल करेल हे निश्चित मानलं जात आहे. मुंबई इंडियन्सने डॅनियल सॅम्सला बाहेर करण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्याकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत. वेस्ट इंडिजचा फॅबियन एलन आणि ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर रिले मेरेडिथ हे पर्याय उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पहिल्या दोन मॅच खेळलेल्या टीम डेव्हिडलाही आरसीबी विरूद्ध पुन्हा संधी दिली जाऊ शकते.त्याचबरोबर भारतीय खेळाडूंमध्ये बसील थंपीच्या जागी अनुभवी जयदेव उनाडकतला संधी मिळण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Instagram post, Ipl 2022, Mumbai Indians, Social media