जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : ऋतुराजचं शतक एक रनने हुकलं, होम ग्राऊंडवर बेस्ट बॉलिंगलाच धुतलं!

IPL 2022 : ऋतुराजचं शतक एक रनने हुकलं, होम ग्राऊंडवर बेस्ट बॉलिंगलाच धुतलं!

Photo-IPL/BCCI/Twitter

Photo-IPL/BCCI/Twitter

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सीएसकेच्या (SRH vs CSK) ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) वादळी खेळी केली, पण त्याचं शतक एका रनने हुकलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 1 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सीएसकेच्या (SRH vs CSK) ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) वादळी खेळी केली, पण त्याचं शतक एका रनने हुकलं. 57 बॉलमध्ये 99 रन करून ऋतुराज गायकवाड आऊट झाला, त्याच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. ऋतुराज गायकवाडला सीएसकेचा ओपनर डेवॉन कॉनवेनेही (Devon Conway) चांगली साथ दिली. ऋतुराज आणि कॉनवे यांच्यात 17.5 ओव्हरमध्ये 182 रनची पार्टनरशीप झाली. आयपीएल इतिहासातली सीएसकेची ही सगळ्यात मोठी पार्टनरशीप आहे. डेवॉन कॉनवे 55 बॉलमध्ये 85 रनवर नाबाद राहिला, त्याने 8 फोर आणि 4 सिक्स मारले. ऋतुराज आणि कॉनवेच्या या वादळी खेळींमुळे सीएसकेने 20 ओव्हरमध्ये 202/2 एवढा स्कोअर केला. आयपीएलच्या या मोसमात हैदराबादची बॉलिंग सर्वोत्तम आहे, पण ऋतुराज आणि कॉनवे यांनी त्यांच्यावरच आक्रमण केलं. आयपीएलच्या या मोसमात ऋतुराज गायकवाड संघर्ष करत होता. 9 मॅचच्या 9 इनिंगमध्ये ऋतुराजने 35.14 ची सरासरी आणि 129.47 च्या सरासरीने 246 रन केले, यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. चेन्नई सुपर किंग्स या सामन्यापासून पुन्हा एकदा एमएस धोनीच्या नेतृत्वात मैदानात उतरत आहे. सीएसकेच्या खराब कामगिरीनंतर रवींद्र जडेजाने टीमची कॅप्टन्सी सोडली आणि पुन्हा एकदा धोनीकडे टीमचं नेतृत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विलियमसनने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. सीएसकेने या सामन्यात टीममध्ये एक बदल केला. ड्वॅन ब्राव्होऐवजी डेवॉन कॉनवेला संधी देण्यात आली. कॉनवने मिळालेल्या या संधीचं सोनं केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: csk , ipl 2022
  • First Published :
जाहिरात
जाहिरात