नवी मुंबई, 22 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians vs CSK) आणखी एक पराभव झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या या रोमांचक सामन्यात मुंबईला धक्का बसला. शेवटच्या बॉलला 4 रनची गरज असताना एमएस धोनीने (MS Dhoni) फोर मारत मुंबईच्या तोंडातून पराभवाचा घास हिसकावून घेतला. आयपीएलच्या या मोसमातला मुंबईचा हा लागोपाठ सातवा पराभव आहे. या हंगामात मुंबईला अजून एकही मॅच जिंकता आलेली नाही, त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्येही मुंबई शेवटच्या क्रमांकावर आहे.
एमएस धोनीने फक्त बॅटिंगच नाही तर त्याआधी सीएसकेची फिल्डिंग सुरू असतानाही मुंबईला आपल्या जाळ्यात अडकवलं. मॅच सुरू होताच धोनीने मुकेश चौधरीला काही टीप्स दिल्या, यानंतर चौधरीने पहिल्याच ओव्हरमध्ये मुंबईला दोन धक्के दिले, त्याने रोहित शर्मा आणि इशान किशनला शून्य रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
कायरन पोलार्ड बॅटिंगला आलेला असताना एमएस धोनीने वापरलेली रणनितीचं कौतुक होत आहे.
Kids use same barber for 10+ years Adults use same dp for 10+ years Legends use same gameplan for 10+ years #MIvCSK #IPL2022 pic.twitter.com/J5lPJ7chBT
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) April 21, 2022
महीश तीक्षणाच्या बॉलिंगवर धोनीने शिवम दुबेला बरोबर साईट स्क्रीनजवळ फिल्डिंगसाठी उभं केलं होतं. धोनीच्या या ट्रॅपमध्ये पोलार्ड फसला. तीक्षणाच्या बॉलिंगवर पोलार्डने सरळ शॉट मारला आणि शिवम दुबेने बाऊंड्री लाईनवर कॅच पकडला. 9 बॉलमध्ये 14 रन करून पोलार्ड आऊट झाला.
— Maqbool (@im_maqbool) April 21, 2022
Field set by MS Dhoni, next ball Kieron Pollard out. pic.twitter.com/qmg00JFwMM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 21, 2022
No need caption.@MSDhoni #IPL2022 #WhistlePodu pic.twitter.com/dBoozLInF4
— DHONI Trends™ (@TrendsDhoni) April 21, 2022
आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्सने 7 पैकी 2 मॅच जिंकल्या असून 5 मॅचमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं आहे. चेन्नईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. मुंबई आणि चेन्नई या आयपीएल इतिहासातल्या सगळ्यात यशस्वी टीम आहेत. मुंबईने 5 वेळा आणि चेन्नईने 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे, पण यंदा या दोन्ही टीम तळाला आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Csk, Ipl 2022, Kieron pollard, MS Dhoni, Mumbai Indians