मुंबई, 2 मे : महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्त होऊन आता दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तो आयपीएल वगळता अन्य स्पर्धांमध्ये खेळत नाही. त्यानंतरही त्याचे क्रिकेटवरील प्रभुत्व कायम आहे. मागील सिझनमधील सीएसकेचा नेट बॉलर असलेला मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) यंदा टीमचा मुख्य अस्त्र बनला आहे. प्रत्येक मॅचमध्ये त्याच्या कामगिरीमध्ये सुधारणा होत आहे. सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये धोनीनं दिलेला सल्ला मुकेशच्या कामी आला. त्यानं हैदराबाद विरूद्ध 4 विकेट्स घेत चेन्नईच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.
चेन्नईनं पहिल्यांदा बॅटींग करत 2 आऊट 202 रन केले होते. हा मोठा स्कोर असला तरी मॅच जिंकण्यासाठी चेन्नईला चांगली बॉलिंग करणे आवश्यक होते. त्यावेळी धोनीनं मुकेशला 'चांगल्या लाईन आणि लेन्थवर बॉलिंग कर आणि नो बॉल टाकू नकोस. बॅटरनं फोर लगावला तरी त्यानं फरक पडणार नाही. फक्त अतिरिक्त रन देऊ नकोस' हा सल्ला दिला. धोनीच्या या सल्ल्याची मुकेशनं अंमलबजावणी केली आणि तो विजयाचा हिरो ठरला. त्यानं त्याच्या 4 ओव्हर्सच्या कोट्यात एकही नो बॉल टाकला नाही.
मुकेशनं हैदराबाद विरूद्ध 4 ओव्हरमध्ये 46 रन देत 4 विकेट्स घेतल्या. तो महागडा ठरला. पण, त्यानं हैदराबादच्या इनिंगमधील 18 व्या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये शशांक सिंह आणि वॉशिंग्टन सुंदर यांना आऊट करत मॅचचं पारडं चेन्नईच्या बाजूनं झुकवलं. निकोलस पुरननं शेवटी फटकेबाजी केली. त्यानं मुकेशच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 3 सिक्स आणि 1 फोर लगावला. पण, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. चेन्नईनं ही मॅच 13 रननं जिंकली आणि 'प्ले ऑफ' च्या आशा कायम ठेवल्या.
IPL 2022 : धोनीच्या एका निर्णयानं मिळाला CSK ला विजय, मॅचनंतर सांगितला टर्निंग पॉईंट
मुकेश या सिझनमध्ये चेन्नईचा स्ट्राईक बॉलर बनला आहे. त्यानं ड्वेन ब्राव्हो (14 विकेट्स) नंतर सीएसकेसाठी सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्यानं आत्तापर्यंत 8 मॅचमध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत. हैदराबाद विरूद्ध ब्राव्होच्या अनुपस्थितीमध्ये त्यानं डेथ ओव्हरमध्येही बॉलिंग करत टीमला यश मिळवून दिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.