मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : धोनीच्या एका निर्णयानं मिळाला CSK ला विजय, मॅचनंतर सांगितला टर्निंग पॉईंट

IPL 2022 : धोनीच्या एका निर्णयानं मिळाला CSK ला विजय, मॅचनंतर सांगितला टर्निंग पॉईंट

महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) पुन्हा एकदा सीएसकेच्या अपेक्षा कायम ठेवल्या आहेत. रविवारी झालेल्या  सामन्यात सीएसकेनं सनरायझर्स हैदराबादचा (CSK vs SRH) 13 रननं पराभव केला.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 2 मे : महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) पुन्हा एकदा सीएसकेच्या अपेक्षा कायम ठेवल्या आहेत. रविवारी झालेल्या  सामन्यात सीएसकेनं सनरायझर्स हैदराबादचा (CSK vs SRH) 13 रननं पराभव केला. या मॅचच्यापूर्वीच धोनी पुन्हा एकदा सीएसकेचा कॅप्टन झाला होता. धोनीनं कॅप्टन होताच पुन्हा एकदा टीमला विजय मिळला. सीएसकेनं पहिल्यांदा बॅटींग करत 2 आऊट 202 रन केले. त्याला उत्तर देताना हैदराबादला 6 आऊट 189 रन करता आले.

या मॅचनंतर धोनी म्हणाला की, '7 ते 14 ओव्हर्समध्ये स्पिनर्सनी चांगली कामगिरी केले. हे विजयाचं मोठं कारण आहे.' महीश तीक्षणानं 4 ओव्हर्समध्ये फक्त 27 रन दिले.रविंद्र जडेजानंही 3 ओव्हरमध्ये अचूक बॉलिंग करत फक्त 15 रन दिले. या दोघांना एकही विकेट मिळाली नसली तरी त्यांनी हैदराबादच्या बॅटर्सना रोखून धरलं. मिचेल स्टँनरनं 3 ओव्हरमध्ये 36 रन देत एक विकेट घेतली.

धोनी मॅचनंतर बोलताना म्हणाला की, 'एका ओव्हरमध्ये 4 सिक्स कुणी लगावले तरी उरलेल्या 2 बॉलवर काही होऊ शकतं असं मी बॉलर्सना सांगितलं होतं. मी याच पद्धतीनं काम करतो. आम्ही पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 25 रन दिले. त्यानंतरही बॉलर्सनी चांगलं कमबॅक केलं. आमच्या बॅटर्सनीही सुरूवातीला मोठा स्कोर करत चांगली सुरूवात केली.'

IPL 2022 : 'सर्व स्पून फीडिंग शक्य नाही' धोनीनं जाहीरपणे सांगितली जडेजाची चूक

एका निर्णयानं बदललं चित्रं

धोनीच्या एका निर्णयाचा मॅचवर मोठा प्रभाव पडला. त्यानं कॅप्टन होताच न्यूझीलंडच्या डेवॉन कॉनवेला (Devon Conway) पुन्हा खेळवण्याचा निर्णय घेतला. त्याला यापूर्वी फक्त एक मॅच संधी मिळाली होती. धोनीचा हा निर्णय योग्य ठरला. त्यानं 55 बॉलमध्ये नाबाद 85 रन केले. त्याचबरोबर ऋतुराज गायकवाडसोबत पहिल्या विकेटसाठी 182 रनची रेकॉर्ड भागिदारी केली. सीएसकेच्या इतिहासातील ही कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठी भागिदारी आहे. या भागिदारीमुळेच  सीएसकेच्या विजयाचा पाया रचला गेला.

First published:

Tags: Csk, Ipl 2022, MS Dhoni, SRH