मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : पंजाबच्या खेळाडूनं गमावला संयम, Baby AB आऊट झाल्यानंतर केली शेरेबाजी, VIDEO

IPL 2022 : पंजाबच्या खेळाडूनं गमावला संयम, Baby AB आऊट झाल्यानंतर केली शेरेबाजी, VIDEO

ब्रेविस 11 व्या ओव्हरमध्ये ओडियन स्मिथच्या बॉलिंगवर पूल लगावताना आऊट झाला. अर्शदीप सिंगनं त्याचा कॅच घेतला. आऊट झाल्यानंतर परत जात असताना स्मिथनं ब्रेविसला उद्देशून शेरेबाजी केली.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 14 मार्च : मुंबई इंडियन्सचा पंजाब किंग्ज विरूद्ध झालेल्या लढतीमध्ये (Mumbai Indians vs Punjab Kings) 12 रननं पराभव झाला. पंजाबनं दिलेलं 199 रनचं आव्हान मुंबई पार करेल अशी परिस्थिती एकावेळी निर्माण झाली होती. तिसऱ्या क्रमांकावर बॅटींगला आलेल्या डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) याच्या आक्रमक फटकेबाजीनं मुंबईची आशा कायम होती. ब्रेविस आऊट झाल्यानंतर मुंबईच्या इनिंगला ब्रेक लागला.

क्रिकेट विश्वात बेबी एबी (Baby AB) म्हणून प्रसिद्ध असलेल्या ब्रेविसनं 25 बॉलमध्ये 49 रनची आक्रमक खेळी केली.  यामध्ये 5 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता. मुख्य म्हणजे ब्रेविसने बॅटिंगला आल्यानंतर पहिल्या 8 बॉलला एकही रन केली नव्हती. त्याने पंजाब किंग्जचा मुख्य स्पिनर राहुल चहरला (Rahul Chahar) टार्गेट केले. राहुल चहरनं टाकलेल्या नवव्या ओव्हरमध्ये त्यानं सलग 4 सिक्स लगावले.

ब्रेविस 11 व्या ओव्हरमध्ये ओडियन स्मिथच्या बॉलिंगवर पूल लगावताना आऊट झाला. अर्शदीप सिंगनं त्याचा कॅच घेतला. आऊट झाल्यानंतर परत जात असताना स्मिथनं ब्रेविसला उद्देशून काही शेरेबाजी केली. स्मिथच्या या वर्तनावर त्यावेळी कॉमेंट्री करणाऱ्या कॉमेंट्रेटर्सनीही नाराजी व्यक्त केली. अर्थात 18 वर्षांच्या ब्रेविसनं त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तो शांतपणे मैदानातून निघून गेला.

मुंबईककडून तिलक वर्माने 20 बॉल 36 रनची खेळी केली. मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये अर्धशतक करणाऱ्या सूर्यकुमार यादवने 30 बॉलमध्ये 43 रन केले. पंजाबकडून ओडियन स्मिथला 4 विकेट मिळाल्या, तर कागिसो रबाडाला 2 आणि वैभव अरोराला एक विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला होता.

IPL 2022 Points Table : मुंबईचा पराभव करत पंजाबची मोठी उडी, टॉप 4 मधील स्पर्धा तीव्र

पंजाबने मुंबईच्या बॉलर्सची धुलाई करत 20 ओव्हरमध्ये 5 आऊट 198 पर्यंत मजल मारली. शिखर धवनने 50 बॉलमध्ये 70 रन आणि मयंक अग्रवालने 32 बॉलमध्ये 52 रनची खेळी केली. जितेश शर्माने 15 बॉलमध्ये नाबाद 30 आणि शाहरुखने 6 बॉलमध्ये 15 रन केले. मुंबईकडून बसिल थंपीला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, तर जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह आणि मुरुगन अश्विनला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Punjab kings