Home /News /sport /

IPL 2022 : श्रेयस अय्यरकडून आपल्याच टीमची 'पोलखोल', मॅच जिंकल्यानंतर केला गौप्यस्फोट

IPL 2022 : श्रेयस अय्यरकडून आपल्याच टीमची 'पोलखोल', मॅच जिंकल्यानंतर केला गौप्यस्फोट

कोलकाता नाईट रायडर्सनं सोमवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सवर (KKR vs MI) 52 रननं मोठा विजय मिळवला आहे. . या विजयानंतर केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) आपल्याच टीमची पोलखोल केली आहे.

    मुंबई, 10 मे : कोलकाता नाईट रायडर्सनं सोमवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सवर (KKR vs MI) 52 रननं मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह केकेआरनं 'प्ले ऑफ' साठी आव्हान कायम ठेवलं आहे. या विजयानंतर आनंदात असलेला केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) आपल्याच टीमची पोलखोल केली आहे. केकेआर टीमचं एक महत्त्वाचं रहस्य श्रेयसनं जगजाहीर केलं आहे. मुंबई इंडियन्स विरूद्धच्या मॅचमध्ये केकेआरनं पाच बदल केले होते. एकाच मॅचमध्ये केलेल्या इतक्या बदलाबाबत त्याला मॅच संपल्यानंतर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यानं आपल्याच टीमची पोलखोल केली. श्रेयस यावेळी नको ते सांगून गेला. त्यावरून आता चर्चा सुरू झाली असून केकेआरच्या अंतिम 11 ची निवड कोण करतं हा प्रश्न उपस्थित झाला आहे. श्रेयस मॅचनंतर बोलताना म्हणाला की, 'टीमच्या निवडीबाबत मोठी चर्चा झाली. यावेळी टीमच्या कोचसह सीईओ देखील उपस्थित होते. या बैठकीत कोण खेळणार आणि कोण नाही याबाबतचे निर्णय झाले. जे खेळाडू खेळणार नव्हते, त्यांनी कोच ब्रँडन मॅकलुम यांनी स्वत: भेटून या निर्णयाची कल्पना दिली. कोलकाता नाईट रायडर्सचे सीईओ व्यंकी मैसूर आहेत. त्यांनी कधीही कोणत्याही स्पर्धात्मक पातळीवरील क्रिकेट खेळलेलं नाही. त्यानंतरही ते टीम निवडीमध्ये हस्तक्षेप का करतात हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. मोठी बातमी : खराब फॉर्ममधील विराट कोहली होणार टीम इंडियातून Out! श्रेयस अय्यरनं नकळत टीममधील अंतर्गत गोष्टीची पोलखोल केली आहे. केकेआरच्या विजयामुळे याबाबत फार चर्चा झाली नाही. पण, टीम पराभूत झाली असती तर याबाबत नक्कीच वादळ उठलं असतं. मुंबईविरुद्धच्या या विजयामुळे केकेआरचं प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचं आव्हान अजूनही कायम आहे. नवव्या क्रमांकावर असलेली केकेआर या विजयासह थेट सातव्या क्रमांकावर गेली आहे. केकेआरने 12 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्स शेवटच्या क्रमांकावर कायम आहे. मुंबईने 11 पैकी 9 मॅच हरल्या आहेत तर फक्त 2 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ipl 2022, KKR, Mumbai Indians, Shreyas iyer

    पुढील बातम्या