मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : मुंबईच्या शेवटच्या मॅचमध्ये तरी अर्जुनला संधी मिळणार का? रोहितच्या निर्णयाकडं सर्वांचं लक्ष

IPL 2022 : मुंबईच्या शेवटच्या मॅचमध्ये तरी अर्जुनला संधी मिळणार का? रोहितच्या निर्णयाकडं सर्वांचं लक्ष

मुंबईचा ऑल राऊंडर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) शेवटच्या सामन्यात तरी पदार्पण करणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.

मुंबईचा ऑल राऊंडर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) शेवटच्या सामन्यात तरी पदार्पण करणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.

मुंबईचा ऑल राऊंडर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) शेवटच्या सामन्यात तरी पदार्पण करणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.

मुंबई, 21 मे : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) आयपीएल 2022 मधील शेवटचा सामना आज (शनिवार) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध होणार आहे. दिल्लीचं 'प्ले ऑफ' चं भवितव्य या सामन्यावर ठरणार आहे. त्यामुळे दिल्लीसाठी हा सामना 'करो वा मरो' स्वरूपाचा आहे. दुसरिकडं मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आलंय. मुंबईसाठी हा आयपीएल सिझन (IPL 2022) निराशाजनक ठरलाय. त्यांनी आत्तापर्यंत 13 पैकी फक्त 3 सामने जिंकले असून पॉईंट टेबलमध्ये त्यांचा क्रमांक सर्वात शेवटी आहे.

स्पर्धेचं आव्हान संपुष्टात आल्यानंतरही मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना या सामन्याची मोठी उत्सुकता आहे. मुंबईचा ऑल राऊंडर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) या सामन्यात आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. अर्जुन गेल्या आयपीएल सिझनपासून मुंबई इंडियन्सचा सदस्य आहे. पण, त्याला अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.

रोहितनं दिले संकेत

अर्जुन नेट प्रॅक्टीस करत असलेले व्हिडीओ सोशल मीडियावर यापूर्वी व्हायरल झाले आहेत. ते व्हिडीओ पाहून अर्जुनला कधी संधी मिळणार ? हा प्रश्न फॅन्स विचारत आहेत.  आयपीएलच्या या मोसमात मुंबईने आतापर्यंत 22 खेळाडूंना संधी दिली आहे, तर आर्यन जुयाल, राहुल बुद्धी आणि अर्जुन तेंडुलकर हे तीनच खेळाडू अजूनही पहिल्या मॅचच्या प्रतिक्षेत आहेत. हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर रोहितने पुढच्या मोसमासाठी आम्ही वेगवेगळ्या खेळाडूंना संधी देत आहोत, अशी प्रतिक्रिया दिली, तसंच पुढच्या सामन्यातही काही नव्या खेळाडूंना मैदानात उतरवलं जाईल, असं रोहित म्हणाला. रोहितच्या या वक्तव्यामुळे अर्जुन तेंडुलकरला खेळण्याची संधी मिळेल, असं मानलं जात आहे.

IPL 2022 : विराट कोहलीमध्ये दिसला अंडरटेकर, शुभमन गिलकडं पाहात केला खतरनाक इशारा! VIDEO

अर्जुन तेंडुलकर डावखुरा फास्ट बॉलर आहे. मुंबईकडून तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळला आहे. तसंच तो खालच्या क्रमांकावर आक्रमक बॅटिंगही करतो. मुंबईतल्या स्थानिक टी-20 लीगशिवाय अर्जुनची मुंबईच्या रणजी ट्रॉफी टीममध्येही निवड झाली आहे.वानखेडे स्टेडियमशी सचिन तेंडुलकरचंही खास नातं आहे. याच मैदानात सचिनने वर्ल्ड कप जिंकला होता, त्यामुळे अर्जुनसाठीही या मैदानात पदार्पण करणं खास असेल.

First published:
top videos

    Tags: Arjun Tendulkar, Delhi capitals, Ipl 2022, Mumbai Indians