मुंबई, 21 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) ही आयपीएलमधील दोन सर्वात यशस्वी टीममधील लढत आज (गुरूवार) होणार आहे. या दोन्ही टीमसाठी हा सिझन चांगला झालेला नाही. पॉईंट टेबलमध्ये अगदी तळाशी असलेल्या दोन्ही टीमना स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. या मॅचपूर्वी सीएसकेचा ओपनर डेवॉन कॉनवे (Devon Conway) दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आहे. कॉनवे न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असला तरी त्याचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला आहे. कॉनवेनं या सिझनमध्ये सीएसकेकडून फक्त एक मॅच खेळली आहे. तो त्याच्या लग्नासाठी आफ्रिकेला रवाना झालाय. 24 एप्रिल रोजी तो पुन्हा टीममध्ये दाखल होईल. आयपीएलमधील नियमानुसार त्याला तीन दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे. त्यामुळे तो गुरुवारी मुंबई इंडियन्ससह 25 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरूद्ध होणाऱ्या मॅचसाठी उपलब्ध नसेल. 25 एप्रिलच्या मॅचनंतर सीएसकेला 1 मे पर्यंत ब्रेक आहे. चेन्नईची या सिझनमधील सुरूवात अत्यंत खराब झाली आहे. यंदा पहिल्यांदाच रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या सीएसकेनं सहापैकी पाच सामने गमावले असून फक्त एक सामना जिंकला आहे. पॉईंट टेबलमध्ये सीएसके नवव्या क्रमांकावर आहे. CSK च्या कॅम्पमध्ये दाक्षिणात्य पद्धतीने Conway च्या प्री वेडींगचे सेलिब्रेशन, Dhoni सह खेळाडू दिसले पारंपारिक वेषात चेन्नई सुपर किंग्सच्या वतीनं कॉनवे दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी बायो-बबलमध्ये खास प्री वेडिंग पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ उपस्थित होता. कॉनवेला यावर्षी झालेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये सीएसकेनं 1 कोटींना खरेदी केले आहे. त्यानं कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध झालेल्या पहिल्या मॅचमध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.