मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022: विराटसमोर धर्मसंकट,आवडत्या खेळाडूंमध्ये कुणाची करणार निवड आणि कुणाला देणार अंतर?

IPL 2022: विराटसमोर धर्मसंकट,आवडत्या खेळाडूंमध्ये कुणाची करणार निवड आणि कुणाला देणार अंतर?

आजवर एकदाही आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद न पटकावणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) पुढे कोणत्या खेळाडूंना रिटेन करायचं हा मोठा प्रश्न आहे.

आजवर एकदाही आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद न पटकावणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) पुढे कोणत्या खेळाडूंना रिटेन करायचं हा मोठा प्रश्न आहे.

आजवर एकदाही आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद न पटकावणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) पुढे कोणत्या खेळाडूंना रिटेन करायचं हा मोठा प्रश्न आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 25 नोव्हेंबर :  आयपीएल 2022 (IPL 2022) साठी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची अखेरची तारीख 30 नोव्हेंबर आहे. सर्वच टीम आपली यादी अंतिम करत आहेत. आजवर एकदाही आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद न पटकावणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) पुढे कोणत्या खेळाडूंना रिटेन करायचं हा मोठा प्रश्न आहे.

विराट कोहलीनं (Virat Kohli) आरसीबीची कॅप्टनसी सोडली असली तरी तो आजही टीमचा मुख्य खेळाडू आहे. विराट कोहलीनंच ही टीम उभी केली आहे. त्यामुळे रिटेन खेळाडूंची यादी तयार करताना विराटचा शब्द अंतिम असेल. मागच्या सिझनमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) आरसीबी रिटेन करणार हे जवळपास नक्की आहे. मात्र उर्वरित 2 जागांसाठी आरसीबीकडं 5 पर्याय आहेत.

युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) : आरसीबीचा मुख्य स्पिनर. यूएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या सेकंड हाफमध्ये चहलनं दमदार कामगिरी केली होती. आता तो टीम इंडियातही परतलाय. त्याचबरोबर बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर त्याचा रेकॉर्डही दमदार आहे. चहलला आरसीबी रिटेन करण्याची दाट शक्यता आहे.

मोहम्मद सिराज (Mohammed Siraj):  मोहम्मद सिराजसाठी 2021 हे वर्ष चांगलंच यशस्वी ठरलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यात टेस्ट मॅच जिंकण्यात त्याचे मोठे योगदान होते. टी20 क्रिकेटमध्येही त्याची बॉलिंग सुधापरली आहे. मॅचच्या कोणत्या टप्प्यात सिराज बॉलिंग करू शकतो. त्यामुळे पुढील सिझनसाठी रिटेन होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सिराज देखील महत्त्वाचा खेळाडू आहे.

महेंद्रसिंह धोनीचा मास्टर स्ट्रोक, मुंबई इंडियन्सच्या ट्रम्प कार्डला देणार CSK मध्ये एन्ट्री!

देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) : आरसीबीचं भविष्य म्हणून देवदत्तकडं बघितलं जातं. त्यानं मागील दोन्ही सिझनमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 21 वर्षांचा पडिक्कल हा आरसीबीची दीर्घकाळाची गुंतवणूक ठरू शकतो. त्याचबरोबर तो बंगळुरूचा असल्यानं त्याचं आरसीबी फॅन्सशी लोकल कनेक्शन देखील आहे.

हर्षल पटेल (Harshal Patel) : हर्षल पटेलनं आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये सर्वाधिक  32 विकेट्स घेतल्या. एका सिझनमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेण्याच्या आयपीएल रेकॉर्डची हर्षलनं बरोबरी केली आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर हर्षलनं टीम इंडियातही जागा मिळवली असून न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेतही प्रभावित केले आहे.

IND vs NZ: आधी दिलासा नंतर निराशा, 2 बॉलमध्ये बदललं रहाणेचं नशीब!

वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar): वॉशिंग्टन सुंदर हा दुखापतीमुळे गेली काही महिने क्रिकेटपासून दूर आहे. मात्र तो देखील आरसीबीसाठी उपयुक्त खेळाडू आहे. पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करण्याची सुंदरची क्षमता असून त्याच्या बॅटींगचाही टीमला उपयोग होऊ शकतो.

First published:

Tags: Ipl 2022 auction, RCB, Virat kohli