मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022: महेंद्रसिंह धोनीचा मास्टर स्ट्रोक, मुंबई इंडियन्सच्या ट्रम्प कार्डला देणार CSK मध्ये एन्ट्री!

IPL 2022: महेंद्रसिंह धोनीचा मास्टर स्ट्रोक, मुंबई इंडियन्सच्या ट्रम्प कार्डला देणार CSK मध्ये एन्ट्री!

आयपीएलच्या पुढील सिझनपूर्वी होणाऱ्या मेगा ऑक्शनचे (IPL 2022 Mega Auctuion) पडघम आता वाजू लागले आहेत. आगामी ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सच्या ट्रम्प कार्डवर महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) नजर आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 25 नोव्हेंबर : आयपीएलच्या पुढील सिझनपूर्वी होणाऱ्या मेगा ऑक्शनचे (IPL 2022 Mega Auctuion) पडघम आता वाजू लागले आहेत. आयपीएलमधील जुन्या आठ टीमसाठी त्यांच्या रिटेन खेळाडूंची यादी देण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे. त्यामुळे आठही फ्रँचायझी या खेळाडूंची यादी फायनल करण्याबरोबरच आगामी ऑक्शनमध्ये कोणत्या खेळाडूला खरेदी करायचं? याची रणनीती ठरवत आहेत.

'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार आयपीएल 2021 ची चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने (CSK) महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांना रिटेन केलं आहे. तर पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सनं  रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तर कायरन पोलार्डसोबत (Kieron Pollard) टीमची बोलणी सुरू आहेत. तर सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) लिलावातून विकत घेण्यासाठी आग्रही आहे. याशिवाय मुंबईची टीम ईशान किशनलाही (Ishan Kishan) रिटेन करण्याची शक्यता जास्त आहे.

मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) रिटेन करणार नाही, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. हार्दिकच्या फिटनेसचा त्याच्या फॉर्मवर परिणाम झाला आहे. आयपीएल स्पर्धेच्या सेकंड हाफमध्ये हार्दिकनं बॉलिंगही केली नव्हती. त्याचा फटका मुंबईला बसला. आता धोनी आयपीएल लिलावात हार्दिकला खरेदी करण्यासाठी आग्रही आहे.

IND vs NZ: शुभमन गिल ठरला मुकद्दर का सिकंदर! 2 निर्णयांचा मिळाला मोठा फायदा

हार्दिक पांड्या हा महेंद्रसिंह धोनीला मोठा भाऊ मानतो. धोनीच्या कॅप्टनसीमध्येच हार्दिकनं टीम इंडियात पदार्पण केले होते. आपल्याला खडतर काळात धोनीनं साथ दिल्याचं हार्दिकनं एक मुलाखतीमध्ये सांगितले होते. इतकंच नाही तर टी20 वर्ल्ड कपपूर्वी निवड समितीनं फॉर्मात नसलेल्या हार्दिकला परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी धोनीनंच मध्यस्थी करत हार्दिकची टीममधील जागा वाचवली.सीएसकेला ड्वेन ब्राव्होच्या जागी एक दमदार ऑल राऊंडर हवा आहे. हार्दिक ही कामगिरी करेल असा धोनीला विश्वास आहे. त्यामुळे त्यानं मॅनेजमेंटकडं हार्दिकच्या नावाचा आग्रह केल्याचं वृत्त आहे.

First published:

Tags: Csk, Hardik pandya, Ipl 2022 auction, MS Dhoni