मुंबई, 2 फेब्रुवारी: बीसीसीआयने आयपीएल मेगा ऑक्शनसाठी 590 खेळाडूंची यादी मंगळवारी जाहीर केली आहे. यापैकी साधारण 200 जणांची लिलावातून निवड होईल. त्यामुळे प्रत्येक जागेसाठी मोठी स्पर्धा आहे. आयपीएल ऑक्शनपूर्वी जोरदार खेळ करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न सर्व खेळाडू करत आहेत. बीसीसीआयनं यादी जाहीर करताच त्याचे पडसाद पाकिस्तानमध्ये उमटले. पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2022) खेळणाऱ्या बॅटरनं धडाकेबाज खेळ करत आगामी सिझनसाठी दावेदारी सादर केली आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये मंगळवारी मुलतान सुलतान विरूद्ध इस्लामाबाद युनायटेड यांच्यात लढत झाली. या सामन्यात दोन्ही टीमच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. मुलतानकडून खेळणाऱ्या टीम डेव्हिडनं (Tim David) फक्त 29 बॉलमध्ये 71 रनची वादळी खेळी केली. पाचव्या क्रमांकावर आलेल्या डेव्हिडनं 6 फोर आणि 6 सिक्स लगावले. त्याच्या फटकेबाजीमुळे मुलतानने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 आऊट 217 रन केले.
14 sixes in the innings. Yes you read that right! 21 Fours and that was enough to get a mammoth total! @timdavid8 71 (29)@shani_official 43 (31)@Rileerr 67 (35)#IUvMS #Sultans #HBLPSL7 pic.twitter.com/EWYdN0vD6U
— Multan Sultans (@MultanSultans) February 1, 2022
टीम डेव्हिडला मागील सिझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (RCB) करारबद्ध केले होते. त्याला मागील सिझनमध्ये फक्त 1 मॅच संधी मिळाली होती. मिडल ऑर्डरमधील धोकादाक बॅटर असलेल्या डेव्हिडला यंदाच्या लिलावात चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. टीम इंडियाची पुढील Day-Night टेस्टची तयारी सुरू, BCCI नं केलं नियोजन! इस्लामाबाद युनायटेडनं 218 रनचा पाठलाग करण्याचा जोरदार प्रयत्न केला. इस्लामाबादचा कॅप्टन शादाब खाननं (Shadab Khan) 42 बॉलमध्ये 91 रन केले. शादाबनं या खेळीत 5 फोर आणि 9 सिक्स लगावले. शादबचे हे शर्थीचे प्रयत्न अखेर अपुरे पडले. त्याच्या टीमचा 20 रनने पराभव झाला.