मुंबई, 2 फेब्रुवारी: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) या वर्षीच्या डे-नाईट टेस्टची तयारी सुरू केली आहे. भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात बंगळुरूमध्ये होणारी टेस्ट डे-नाईट आयोजित करण्याचा विचार सुरू आहे. यापूर्वी भारतामध्ये कोलकाता आणि अहमदाबादमध्ये डे-नाईट टेस्ट झाल्या आहेत. बायो-बबलमध्ये खेळाडूंना प्रवेश करणे सोपे व्हावे म्हणून या मालिकेची सुरूवात टेस्ट ऐवजी टी20 नं होण्यावरही लवकरच निर्णय होणार आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ नं हे वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार भारत-श्रीलंकेतील मालिकेची सुरूवात टी20 ने होईल. या मालिकेत प्रवास कमी करण्यासाठी बीसीसीआय सर्व सामने मोहला, आणि धर्मशालामध्ये खेळवण्यावर निचार करत आहे. यापूर्वीच्या माहितीनुसार टेस्ट मॅच बंगळुरू आणि मोहालीमध्ये तर 3 टी20 सामने मोहाली, धर्मशाला आणि लखनऊमध्ये होणार आहेत. भारत-श्रीलंका मालिकेचे पहिले दोन टी20 सामने धर्मशालामध्ये होतील. त्यानंतर तिसरा टी20 सामना आणि टेस्ट मालिका मोहलीमध्ये होईल. लखनऊमध्ये सामना होणार नाही, असा दावा या वृत्तामध्ये करण्यात आाला आहे. मोहालीमध्ये संध्याकाळी पडणारे दव हा मोठा मुद्दा आहे. त्यामुळे तिथं डे-नाईट टेस्ट आयोजित करणे अवघड आहे. देशातील कोरोना परिस्थितीवर बीसीसीआयचे लक्ष आहे. त्यानुसार लवकरच अंतिम निर्णय होणार आहे. Hitman Is Back! West Indies इंडिज सीरिजपूर्वी रोहितवर रिलिज झाले दमदार रॅप, पाहा VIDEO विराटची 100 वी टेस्ट 100th test of Virat Kohli भारत विरूद्ध श्रीलंका मालिकेतील पहिली टेस्ट विराट कोहलीसाठी (Virat Kohli) महत्त्वाची आहे. कारण, ती त्याच्या कारकिर्दीमधील शंभरावी टेस्ट असेल दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या मालिकेतील पराभवानंतर विराटनं टेस्ट मॅचच्या टीमची कॅप्टनसी सोडली आहे. कॅप्टनसी सोडल्यानंतर विराट तेव्हा पहिल्यांदाच खेळाडू म्हणून टेस्ट खेळेल. विराटच्या जागेवर टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून कुणाची निवड होणार याकडेही सर्व क्रिकेट फॅन्सचं लक्ष लागलेलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.