जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL Auction 2022 : श्रेयस अय्यरसाठी 'या' टीमचे 20 कोटींचे बजेट! माजी क्रिकेटपटूचा दावा

IPL Auction 2022 : श्रेयस अय्यरसाठी 'या' टीमचे 20 कोटींचे बजेट! माजी क्रिकेटपटूचा दावा

IPL Auction 2022 : श्रेयस अय्यरसाठी 'या' टीमचे 20 कोटींचे बजेट! माजी क्रिकेटपटूचा दावा

आयपीएल मेगा ऑक्शनची (IPL 2022 Mega Auction) तारीख जवळ येत आहे. ही तारीख जवळ येत असतानाच कोणता खेळाडू सर्वाधिक महागडा ठरणार याची चर्चा सुरू झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 फेब्रुवारी : आयपीएल मेगा ऑक्शनची (IPL 2022 Mega Auction) तारीख जवळ येत आहे.  12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये हे ऑक्शन होणार आहे. यंदा 8 ऐवजी 10 टीम ऑक्शनमध्ये सहभागी होणार आहेत. या लिलावातील खेळाडूंची यादी बीसीसीआयनं मंगळवारी प्रसिद्ध केली आहे. आयपीएल लिलावाची तारीख जवळ येत असतानाच कोणता खेळाडू सर्वाधिक महागडा ठरणार याची चर्चा सुरू झाली आहे. आगामी लिलावातील संभाव्य महागड्या खेळाडूंच्या यादीत श्रेयस अय्यरचे (Shreyas Iyer) नाव लिलावात उपलब्ध आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) माजी कॅप्टनवर यंदा अनेक टीमची नजर आहे. विशेषत: ज्या टीमचा कॅप्टन अद्याप नक्की नाही, त्यांच्या यादीमध्ये श्रेयसचं नाव अगदी टॉपला आहे.आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) या तीन टीमना सध्या कॅप्टनची गरज आहे. कॅप्टनच्या शोधात असलेल्या या तीन टीममधील आरसीबीने श्रेयस अय्यरसाठी 20 कोटी बाजूला ठेवले आहेत अशी माहिती आपल्याला एकानं दिली असा दावा टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्रानं (Aakash Chopra) केला आहे. आकाशनं त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना हा दावा केला. आरसीबी किंवा केकेआर टीमकडे श्रेयस जाईल. पंजाब किंग्ज त्याला खरेदी करेल असं मला वाटत नाही, असेही आकाशने यावेळी सांगितले. IPL Auction 2022: नाव निश्चित होताच बॅटमधून वादळ, 29 बॉलमध्ये काढले 71 रन श्रेयस अय्यर हा सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो असा अंदाज आकाशने व्यक्त केला आहे. तर विदेशी खेळाडूंमध्ये कागिसो रबाडा, डेव्हिड वॉर्नर आणि क्विंटन डी कॉक यांना सर्वाधिक किंमत मिळेल, असे भाकित त्याने व्यक्त केले आहे. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) माजी कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) 2015 नंतर पहिल्यांदाच लिलावात उतरत आहे. आयपीएलमध्ये कॅप्टन होण्यासाठी अय्यरने दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडल्याचीही चर्चा आहे. दिल्ली कॅपिटल्स सोडल्यानंतर श्रेयस अय्यरला लखनऊ किंवा अहमदाबादची नवीन टीम विकत घेईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण लखनऊने केएल राहुलला तर अहमदाबादने हार्दिक पांड्याला टीमचं कर्णधार केलं. या दोन नव्या टीमसोबत करार न झाल्यामुळे श्रेयस अय्यर लिलावात उतरला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात