मुंबई, 24 डिसेंबर: आयपीएल 2022 (IPL 2022) चं काऊंट डाऊन सुरू झालं आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. आगामी आयपीएल सिझनमध्ये 2 नव्या टीम पहिल्यांदाच खेळणार आहेत. तसंच खेळाडूंचे मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) होणार आहे. त्यामुळे सर्वच टीमची रचना बदलेल. त्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) याने त्याच्या आवडत्या आयपीएल टीमचं नाव सांगितलं आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) टेस्ट सीरिजमध्ये गिल खेळला होता. त्याला दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाता आले नाही. कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) त्याला आगामी सिझनसाठी रिटेन केलेले नाही. केकेआरने व्यंकटेश अय्यर, वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण आणि आंद्रे रसेल या चौघांना रिटेन केले आहे.
केकेआरने गिलला रिटेन केले नसले तरी त्याचा या फ्रँचायझीवरील प्रेम कमी झालेलं नाही. 'माझं केकेआरशी खास नातं आहे. मला नेहमीसाठी एकाच टीमकडून खेळण्याचा पर्याय मिळाला तर मी केकेआरची निवड करेल. मला कायम याच टीमकडून खेळायला आवडेल,' असे गिलने सांगितले.
शेवटच्या बॉलवर जिंकण्यासाठी हवे होते 6 रन, ट्रेंट बोल्टनं केलं असं काही...पाहा VIDEO
आयपीएल 2018 च्या पूर्वी शुभमन गिलला केकेआरन 1.8 कोटींना खरेदी केले होते. त्याने पहिल्या सिझनमधील 13 मॅचमध्ये 146.04 च्या स्ट्राईक रेटनं 203 रन काढले होते. त्यानंतर त्याचा स्ट्राईक रेट कमी झाला. गिलनं केकेआरकडून आत्तापर्यंत 58 मॅचमध्ये 123 च्या स्ट्राईक रेटनं 1417 रन काढले आहेत. आयपीएल 2021 मध्ये गिलनं 17 मॅचमध्ये तीन अर्धशतकासह 478 रन काढले. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट हा फक्त 118 होता. या सिझनमध्ये त्याने व्यंकटेश अय्यर सोबत पहिल्या विकेटसाठी 508 रनची पार्टनरशिप केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Ipl 2022, KKR