मुंबई, 14 जानेवारी : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये लखनऊ आणि अहमदाबाद या शहरांच्या टीम पहिल्यांदाच खेळणार आहेत. या दोन्ही टीमना लिलावाच्या आधी प्रत्येकी 3 खेळाडूंना करारबद्ध करण्याची परवानगी आहे. पंजाब किंग्ज (Punjab Kings) टीममधून बाहेर पडलेला केएल राहुल (KL Rahul) लखनऊ टीमकडून खेळणार हे जवळपास नक्की आहे. त्याचबरोबर या दोन टीमने राहुसह अन्य दोन खेळाडूंसाठी खास प्लॅनिंग केले आहे.
लखनऊची टीम अनकॅप खेळाडू रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) आणि ऑस्ट्रेलियन ऑल राऊंडर मार्कस स्टॉईनिस यांना करारबद्ध करणार असल्याचे वृत्त आहे. बिश्नोईला पंजाबने तर स्टॉईनिसला दिल्लीने सोडले आहे. बिश्नोईनं 2020 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेतल्या होत्या. त्याने पंजाबकडून आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे.
बिश्नोई अनकॅप खेळाडू आहे. त्यामुळे त्याला करार केल्यानंतर 4 कोटी रक्कमच द्यावी लागणार आहे. त्यामुळे लखनऊला कमी पैशांमध्ये चांगला खेळाडू मिळू शकतो. त्याचवेळी स्टॉईनिसला पसंती देण्याचा लखनऊचा निर्णय हा आश्चर्यकारक मानला जात आहे. त्याने मागील आयपीएलमध्ये (IPL 2021) दिल्लीसाठी खास कामगिरी केली नव्हती. त्याने 10 मॅचमध्ये फक्त 2 विकेट्स घेतल्या होत्या.
अहमदाबाद फ्रॅन्चायजीने हार्दिक पांड्याला टीमचा कर्णधार करणार असल्याची चर्चा आहे. आयपीएलमध्ये अहमदाबादची टीम पहिल्यांदाच खेळणार आहे. हार्दिक पांड्या हा मुळचा गुजरातचाच आहे. याशिवाय अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खानही (Rashid Khan) अहमदाबादशीच जोडला गेल्याचं वृत्त आहे. मागच्या मोसमात राशिद खान हैदराबादकडून खेळला होता, पण यावेळी त्याने हैदराबादसोबत राहण्याला नकार दिला, त्यामुळे हैदराबादनेही त्याला रिटेन केलं नाही.
IND vs SA : आफ्रिका दौऱ्यानंतर संपणार सहनशक्ती, टीम इंडियातील दिग्गजांचा होणार फैसला
लिलावाची तारीख ठरली
आयपीएलचा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये होईल. आयपीएल लिलावासाठी सगळ्या राज्य संघांकडून खेळाडूंची यादी मागवण्यात आली आहे. जवळपास 1 हजार खेळाडूंपैकी 250 खेळाडूंना शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यात आयपीएलच्या जुन्या 8 टीमनी एकूण 27 खेळाडू रिटेन केले
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Ipl 2022, Ipl 2022 auction