मुंबई, 14 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) या मालिकेत चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हे टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू सपशेल अपयशी ठरले आहेत . पुजाराने केपटाऊनमधील निर्णायक टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 43 रनची खेळी केली होती. तो दुसऱ्या इनिंगमध्ये फक्त 9 रनवर आऊट झाला. तर राहाणेनं या टेस्टमधील दोन्ही इनिंगमध्ये मिळून 10 रन काढले आहेत.
पुजारा आणि रहाणे हे दोघंही गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्ममुळे चर्चेत आहेत. सोशल मीडियावर फॅन्सनी त्यांच्या खेळण्यावर वारंवार नाराजी व्यक्त केली असून अनेकदा प्रश्न विचारले आहेत. टीम मॅनेजमेंटनं आजवर या सर्वाकडे दुर्लक्ष देत अनुभनी खेळाडूंना अनेक संधी दिल्या आहेत. आता या दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनंतर या दोघांची टीममधील जागा धोक्यात आली आहे.
हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल असे अनेक पर्याय टीम इंडियाकडे मिडल ऑर्डरमधील जागा घेण्यासाठी आहेत. श्रीलंकेविरुद्ध 2 मार्चपासून सुरू होणाऱ्या टेस्ट सीरिजमध्ये त्यांचा विचार होऊ शकतो. तसेच निवड समिती पुजारा-रहाणे जोडीला बाहेरचा रस्ता दाखवू शकते.
मॅचच्या तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच बॉलला चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आऊट झाला, यानंतर रहाणे मैदानात उतरला. टीम अडचणीत असल्यामुळे रहाणेकडून चांगल्या खेळाची अपेक्षा होती, पण तो फक्त 9 बॉलमध्ये 1 रन करून आऊट झाला. रहाणेनं या सीरिजमध्ये 22.66 च्या सरासरीने 136 रन केले आहेत. पुजाराची कामगिरी तर यापेक्षाही खराब आहे. त्याने 20.66 च्या सरासरीने 124 रन काढले आहेत.
IND vs SA: शमी-बुमराह बदलणार मॅचचं चित्र, ऐतिहासिक विजयासाठी टीम इंडियाची खास रणनीती
भारतीय क्रिकेट टीममध्ये कोणत्याही अपयशी खेळाडूंना गेल्या काही वर्षात मिळाली नाही तितकी संधी या दोघांनाही मिळाली आहे. पण, या सीरिजनंतर सहनशक्ती समाप्त होऊन पुजारा आणि रहाणे जोडीच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajinkya rahane, Cricket news, Pujara