मुंबई, 22 जानेवारी : आयपीएल स्पर्धेचे मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) पुढील महिन्यात होणार आहे. यापूर्वी सर्व 10 टीमनं मिळून 33 खेळाडूंना रिटेन केले आहे. आता उर्वरित सर्व खेळाडूंचा लिलावात समावेश होणार आहे. बंगळुरूमध्ये 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लिलावात या खेळाडूंवर बोली लागणार आहे. या लिलावानंतर सर्व 10 टीमची रचना निश्चित होणार आहे.
आयपीएल लिलावासाठी 1214 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यामध्ये सहयोगी देशांच्या (Associate countries) 41 खेळाडूंचा समावेश आहे, असं वृत्त 'क्रिकइन्फो' नं दिली आहे. यामध्ये 49 खेळाडूंनी सर्वाधिक 2 कोटींच्या बेस प्राईससाठी नोंदणी केली आहे. यामध्ये 17 भारतीय तर 32 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
कोणत्या खेळाडूंचा समावेश?
ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आणि सनरायझर्स टीमचा माजी कॅप्टन डेव्हिड वॉर्नर, भारतीय स्पिनर आर. अश्विन, दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर कागिसो रबाडा आणि वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर ड्वेन ब्राव्होचा या यादीत समावेश आहे. वॉर्नरसाठी मागील आयपीएल सिझन निराशाजनक ठरला. पण, त्याचा या स्पर्धेतील रेकॉर्ड भक्कम आहे. तसेच तो गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कपचा 'प्लेयर ऑफ द सीरिज' देखील ठरला आहे. टी20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमधील 'मॅन ऑफ द मॅच' असलेला मिचेल मार्शचा देखील 2 कोटी रूपये बेस प्राईज असलेल्या खेळाडूंच्या यादीत समावेश आहे.
IPL 2022: 10 टीमनं केले 33 खेळाडू रिटेन, वाचा कुणाला मिळणार किती रक्कम!
भारतीय खेळाडूंमध्ये आर. अश्विनसह श्रेयस अय्यर, शिखर धवन, सुरेश रैना, शार्दूल ठाकूर, दिनेश कार्तिक, इशान किशन, अंबाती रायूडू, रॉबीन उथप्पा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, कृणाल पांड्या, हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि देवदत्त पडिक्कल या खेळाडूंचा सर्वाधिक बेस प्राईज असलेल्या खेळाडूंच्या यादीत समावेश आहे.
तर विदेशी खेळाडूंमध्ये वॉर्नर, रबाडा आणि ब्राव्होसह स्टीव्ह स्मिथ, शाकीब अल हसन, क्विंटन डी कॉक, जोश हेजलवूड, जेसन रॉय, ट्रेंट बोल्ट, ख्रिस जॉर्डन, इम्रान ताहीर आणि मॅथ्यू वेड या प्रमुख खेळाडूंची बेस प्राईज 2 कोटी असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.